शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

नागपुरात पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:30 AM

कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मंजूर न करता प्रशासनाने सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी शिफारस समितीने केली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.

ठळक मुद्देसभागृहाच्या मंजुरीनंतर दरवाढ लागू करण्याची स्थायी समितीची शिफारस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी न देता तो जलप्रदाय विभागाकडे परत पाठविण्यात आला. जलप्रदाय विभागाने ५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. निवासींसोबत झोपडपट्टीवासीयांनाही ही वाढ सोसावी लागणार आहे. प्रति युनिटमागे ३५ पैसे जादा द्यावे लागतील. यातून महापालिकेचे उत्पन्न १० ते १३ कोटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने हा प्रस्ताव मंजूर न करता प्रशासनाने सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी शिफारस समितीने केली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.निवासी वापरासाठी १ ते २० व २१ ते ३०, ३१ ते ८० आणि ८० युनिट पुढे असे प्रत्येक टप्प्यात ही दरवाढ प्रस्तावित आहे. निवासी वापरासाठी एका रुपयाची तर, झोपडपट्ट्यांसाठी ३३ पैसे ते एक रुपयांपर्यंतची ही वाढ होणार आहे. संस्थात्मक व व्यावसायिक वापराच्या पाण्याच्या शुल्कातही वाढ होणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी न देता तो परत पाठविला. पाच टक्के पाणीपट्टी दरवाढीचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सुधारित दरवाढ लागू होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.कोरोनात दरवाढीचा बोजा नकोपाणीपट्टीत दरवाढ ही प्रचलित व दरवर्षी होणारी असली तरी कोरोना संसर्गामुळे व्यवसायिक, नोकरदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात सर्वसामान्यांना या दरवाढीचा बोजा नको अशी भूमिका स्थायी समितीने मांडली. दरवर्षी एप्रिल महिन्यात पाणीपट्टी दरवाढ केली जाते मात्र यावर्षी उशिराने ही दरवाढ लागू केली जाणार आहे. यात सर्व स्तरातील पाण्याचे दर ३५ पैसे ते एक रुपयांपर्यंत वाढतील१३ कोटींचा महसूल वाढणारपुढील आर्थिक वर्षात मनपाला पाणीपट्टीच्या माध्यमातून २६० कोटींचा महसूल अपेक्षित आहे. यात पाणी पट्टीतून १३ कोटी गृहीत धरण्यात आलेले आहे.संस्थात्मक वापरासाठीच्या तीन स्तरातील ही वाढ आहे. निवासी पाणीवापराच्या तुलनेत व्यावसायिक वापरासाठी पाणीशुल्क अधिक आहे. यामुळे व्यावसायिकावर पाणीपट्टीचा बोजा अधिक पडणार आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका