शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

उपराजधानीत ८०% कार्यालयांनी थकवला ‘प्रॉपर्टी टॅक्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 10:55 IST

सामान्य नागरिकांनी नियमितपणे मालमत्ता कर भरला पाहिजे, अशी महानगरपालिकेची अपेक्षा असते आणि यासंदर्भात वारंवार नोटिसादेखील बजावण्यात येतात. मात्र सरकारी यंत्रणेत दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे‘सरकारी’ दिव्याखाली अंधार सार्वजनिक बांधकाम खात्याची थकबाकी ८९ लाखांहून अधिक

श्रेयस होले।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य नागरिकांनी नियमितपणे मालमत्ता कर भरला पाहिजे, अशी महानगरपालिकेची अपेक्षा असते आणि यासंदर्भात वारंवार नोटिसादेखील बजावण्यात येतात. मात्र सरकारी यंत्रणेत दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आहे. शहरातील ८० टक्के सरकारी कार्यालयांचा मालमत्ता कर थकीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम खात्याची थकबाकी तर ८९ लाखांहून अधिक झाली आहे.‘लोकमत’ला नागपूर महानगरपालिकेतील सूत्रांनी यासंदर्भातील कागदपत्रेच सोपविली आहेत. यानुसार शहरातील ८० टक्के शासकीय कार्यालयातील मालमत्ता कर थकीत असल्याचे दिसून येत आहे. यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या कार्यालयांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांकडे मालमत्ता कराची एकूण थकबाकी ३ कोटी ७३ लाख ९ हजार ३८० इतकी आहे, तर यंदाची प्रलंबित देय रक्कम १ कोटी १४ लाख ८५ हजार ३९५ इतकी आहे.या यादीत समाविष्ट असलेल्या इतर विभागांमध्ये सिव्हिल लाईन्स येथील ग्रामीण तहसीलदार कार्यालय, प्रधान वनसंरक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय अभियंता कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, विधानभवन, ग्रंथालय, मालमत्ता अधिकारी, प्रधान वनसंरक्षक कार्यालय (वर्किंग प्लान), अणुऊर्जा विभागाचे ‘टाईप-५ क्वॉर्टर्स’, महाराष्ट्र पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळाचे अधीक्षक अभियंता कार्यालय इत्यादींचा समावेश आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या सदर येथील कार्यालयाची थकबाकी तर ८९ लाख ८३ हजार २८३ रुपये इतकी आहे. त्यांना १८ लाख ५८ हजार ६१० रुपयांची नवी ‘डिमांड नोट’देखील पाठविण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडे सव्वादोन कोटींहून अधिक थकबाकीकेंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांची मालमत्ता कराची थकबाकी ही २ कोटी ३५ लाख २९ हजार ५६३ इतकी आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयांच्या यादीत ‘पेटंट इन्फॉर्मेशन सिस्टम’ कार्यालय, ‘एनआरसीसी’ची प्रशासकीय इमारत, विभागीय रेल्वे व्यवस्थापक-सिव्हिल लाईन्स, अणुऊर्जा विभागाचे प्रादेशिक संचालक कार्यालय-सिव्हिल लाईन्स, ‘एनआरसीसी’चे ‘क्वॉर्टर्स’ इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे.धरमपेठ झोनमध्ये १० कोटी थकीतनागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोनअंतर्गत केंद्र शासनाची ८८ तर राज्य शासनाची १०१ कार्यालये किंवा मालमत्ता येतात. त्यातील केंद्राशी संबंधित १५ कार्यालयांचा ३४ लाख तर राज्याशी संबंधित २९ कार्यालयांचा १ कोटी १८ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरण्यात आला आहे. उर्वरितएकूण १४० कार्यालयांचा १० कोटी ५० लाखांचा मालमत्ता कर थकीत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर