नागपुरात प्रॉपर्टी डिलरला चाकूच्या धाकावर लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:36 IST2018-12-15T00:33:05+5:302018-12-15T00:36:02+5:30
अंबाझरी बायपास कॅम्पसजवळ एका बाईकवर आलेल्या गुन्हेगारांनी यवतमाळ येथील एका प्रॉपर्टी डीलरला चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

नागपुरात प्रॉपर्टी डिलरला चाकूच्या धाकावर लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी बायपास कॅम्पसजवळ एका बाईकवर आलेल्या गुन्हेगारांनी यवतमाळ येथील एका प्रॉपर्टी डीलरला चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
अमित गंपावार रा. यवतमाळ असे प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. गंपावार हे त्यांचे मित्र अभय डोईफोडे यांच्यासोबत न्यायालयाच्या कामानिमित्त नागपूरला आले होते. न्यायालयाचे काम संपवून ते वकिलाच्या कार्यालयात गेले. तेथून रात्री ७ वाजता कारने घराकडे परत जात होते. अंबाझरी बायबास कॅम्पस येथील गुरुनानक हॉलजवळ एका बाईकवर चार युवक अचानक गंपावार यांच्या कारसमोर आले. त्यांना काही मदत हवी असेल या उद्देशाने गंपावार यांनी कार थांबवली. युवकांनी त्यांना घेरले. चाकूचा धाक दाखवून गंपावार व त्यांच्या मित्राकडून दागिने, रोख रक्कम अशी एकूण १ लाख १३ हजार रुपयाचा माल लुटुन नेला. तसेच कारची मागची काच फोडून फरार झाले. पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.