Property dealer hangs himself in Nagpur | नागपुरात प्रॉपर्टी डीलरने लावला गळफास

नागपुरात प्रॉपर्टी डीलरने लावला गळफास

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : उंटखाना परिसरात राहणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलरने शुक्रवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. प्रशांत मनोहर खोंडे (वय ४३) असे त्यांचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत प्रॉपर्टी डीलिंग करीत होते. त्यांची पत्नी परिचारिका असून त्यांना एक भाऊ, बहीण आणि आई आहे. प्रशांत आणि त्यांची पत्नी दुसऱ्या माळ्यावर राहत होते. पहिला माळा रिकामा असून तळमाळ्यावर प्रशांतची आई, भाऊ आणि बहीण राहते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे पत्नी आपल्या ड्युटीवर निघून गेली. दुपारी ती परत आली तेव्हा घराचे दार आतून बंद होते. बरेच आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशांतच्या पत्नीने सासू, ननंद आणि भासऱ्याला आवाज दिला. नंतर शेजारीही आले. त्यांनी दाराचा कोंडा तोडला असता प्रशांत गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. दोर कापून खाली उतरवल्यानंतर घरच्यांनी प्रशांतला मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. प्रशांतच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र आर्थिक कोंडीतून नैराश्य आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Property dealer hangs himself in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.