शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन

By admin | Updated: August 26, 2016 03:00 IST

वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयातर्फे वायुसेना, नौसेना व थलसेना या तिन्ही सैन्य दलाच्या मेंटनन्स

पीएमओसीची बैठक : तिन्ही सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा भर नागपूर : वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयातर्फे वायुसेना, नौसेना व थलसेना या तिन्ही सैन्य दलाच्या मेंटनन्स आॅफिसर्स समितीची (पीएओसी) दुसरी बैठक वायुसेनानगर येथे पार पडली. या बैठकीत सैन्यातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण व्हावे, यासाठी प्रोत्साहन मिळावे यावर तिन्ही सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भर दिला. पीएमओसीची दोन दिवसीय बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली होती. अनुरक्षण कमान मुख्यालयाचे वायुसेना आॅफिसर कमांडिंग इन-चीफ एअर मार्शल पंकज अनेजा यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी दुरुस्ती आणि कायापालट करण्यासाठी सप्लाय चेन व्यवस्थापन आॅपरेशनल कमान आणि वायुसेनेला प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. सोबतच तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी एकाच व्यासपीठावर येऊन काम करणेसुद्धा आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. पीएमओसीचे अध्यक्ष व्हॉईस अ‍ॅडमिरल ए.व्ही. सुभेदार यांनी सांगितले की, पीएमओसीचे लक्ष्य व उद्दिष्टांना समोर वाढवावे. मागच्या बैठकीत चांगले सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. तिन्ही सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या समन्वयातून पीएमओसीचे उच्च लक्ष्य प्राप्त करता येऊ शकते. एअर आॅफिसर मेंटनन्स एअर मार्शल पी.पी. खांडेकर यांनी तिन्ही दलाच्या अभियांत्रिकी शाखेमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगितले. बैठकीत मेजर जनरल एम.जे.एस. स्याली यांनी थलसेनेचे नेतृत्व केले. या बैठकीत तिन्ही सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)