विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवासाठी ५० कोटी देण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:14 IST2021-02-23T04:14:02+5:302021-02-23T04:14:02+5:30

नागपूर : २०२३ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यापीठाला अद्ययावत ...

Promise to give Rs 50 crore for the centenary celebrations of the university | विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवासाठी ५० कोटी देण्याचे आश्वासन

विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवासाठी ५० कोटी देण्याचे आश्वासन

नागपूर : २०२३ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यापीठाला अद्ययावत करण्यासाठी ५० कोटींचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती विधान परिषदेचे सदस्य अभिजित वंजारी यांनी दिली.

शताब्दी वर्षानिमित्त जागतिक स्तराची इमारत, अद्ययावत प्रयोगशाळा, राष्ट्रीय क्रीडा उपक्रम आयोजित करण्यासाठी अत्याधुनिक क्रीडांगण व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी वंजारी यांनी केली होती. विद्यापीठाला ५० कोटींचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले व यासंदर्भात वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना निर्देश दिले असल्याची माहिती वंजारी यांनी दिली. १०० कोटी रुपये मंजूर करून घेण्यासाठी विद्यापीठाने बृहत आराखडा सादर करावा, असे पत्र वंजारी यांनी प्रशासनाला दिले आहे.

Web Title: Promise to give Rs 50 crore for the centenary celebrations of the university