रनाळा ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:11 IST2021-02-26T04:11:16+5:302021-02-26T04:11:16+5:30

कामठी : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त रनाळा (ता. कामठी) ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे नुकतचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी प्रमुख ...

Program at Ranala Gram Panchayat Office | रनाळा ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम

रनाळा ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम

कामठी : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त रनाळा (ता. कामठी) ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे नुकतचे आयाेजन करण्यात आले हाेते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुवर्णा साबळे, उपसरपंच आरती कुलरकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण चकोले, अरविंद डोंगरे, अर्चना सपाटे, स्विटी गणेर, मंगला ठाकरे, अंकिता तळेकर, मनोज धानोरकर, सतीश तामशेटवार, इशरत जहा उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी अंतर्गत मतभेद विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे तसेच रनाळा हे गाव आदर्श करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सुवर्णा साबळे यांनी केले. ग्रामविकास अधिकारी राजू फरकाडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. संचालन सपना गावंडे यांनी केले तर अर्चना सपाटे यांनी मानले आभार मानले.

Web Title: Program at Ranala Gram Panchayat Office