शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

संगीताचे गाढे अभ्यासक अप्पासाहेब इंदूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:51 PM

गायन, वादन, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असा बहुविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविलेले, संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचे शुक्रवारी पहाटे देहावसान झाले.

ठळक मुद्देविदर्भाच्या सांगीतिक क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गायन, वादन, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असा बहुविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविलेले, संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचे शुक्रवारी पहाटे देहावसान झाले. ते ९५ वर्षांचे होते.अप्पासाहेब इंदूरकर यांचे नाव जरी कोणी उच्चारले तरी त्यांचे शिष्य प्रथम कानाला हात लावतात. विदर्भाच्या सांगीतिक क्षेत्रात अत्यंत सन्मानजनक, गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे अप्पासाहेब इंदूरकर. गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन, बंदिशींची निर्मिती, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असे त्यांचे चौफेर कार्य राहिले आहे. त्यामुळे केवळ गायकच नाही तर वादक आणि अभ्यासकांनाही वेळोवेळी अप्पासाहेब इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाची गरज भासत आली आहे आणि अप्पासाहेबांनी प्रत्येकवेळी आपल्या विद्यार्थ्यांना भरभरून देण्याचा वसा चालवला आहे.अप्पासाहेबांनी पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून अनेक वर्ष बँकेत नोकरी केली. पण म्हणून त्यांची संगीतावरची निष्ठा कमी झाली नाही. दररोज नित्यनेमाने त्यांचा रियाज चालायचा. संगीतावर असलेली गाढ श्रद्धा आणि अजोड अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी गायन, वादनात प्राविण्य प्राप्त केले. त्याचे अनेक कार्यक्रम झाले. अनेक मोठ्या शास्त्रीय गायकांसोबत त्यांच्या मैफली रंगल्या. संगीताचा एकीकडे रियाज, अध्ययन सुरू असतानाचा त्यांनी अध्यापनाच्या कार्यलाही स्वतला वाहून घेतले. शिकवण्यातला नेमकेपणा, तळमळ, संगीताप्रती असलेले त्यांचे प्रेम यामुळे सर्व वयोगटातील विद्यार्थी त्यांच्याकडे आकृष्ट होऊ लागले. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. आज अशी परिस्थिती आहे की, अप्पासाहेब नागपूरच्या शास्त्रीय व सुगम संगीतातील विद्यार्थी आणि कलाकारांच्या गुरूस्थानी जाऊन बसले आहेत.अप्पासाहेबांच्या सांगीतिक विचारांवर उस्ताद अमीर खाँ साहेबांचा चांगलाच प्रभाव आहे. हा प्रभाव ते स्वत: मान्य करतात आणि जपतातही. उस्ताद अमीर खाँ साहेबांचे सुगम संगीतातील लालित्य व शास्त्रीय संगीतातील बौद्धिक बाजू अप्पासाहेब इंदूरकर यांनी कौशल्याने सांभाळली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदनाला त्यांनी दिलेली नवी चाल विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. अनेक मोठ्या गायकांना त्यांनी हार्मोनियमची संगत केली आहे. आडा चौताल हा त्यांचा विशेष आवडीचा ताल आहे. यात विविध लयीतील त्यांचे चमत्कृतीपूर्ण मुखडे रसिकांना विशेष भावत आले आहेत. त्यांनी निर्मिलेल्या मधुप्रिया रागातील काही रचनाही प्रसिद्ध आहेत.

टॅग्स :musicसंगीत