शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू; आतापर्यंत १,२२,२३३ मतदारांची नोंदणी

By आनंद डेकाटे | Updated: November 8, 2025 19:09 IST

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विभागात आतापर्यंत १ लाख २२ हजार २३३ मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहे. यापैकी ९५,५०० प्रत्यक्ष, तर २६,७३३ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत १ लाख २२ हजार २३३ अर्ज प्राप्त झाले असून, यामध्ये नागपूर जिल्ह्यातून ४० हजार ४४८, वर्धा १३ हजार ०४२, भंडारा १४ हजार ४१४, गोंदिया १८ हजार १३९ चंद्रपूर २४ हजार ५०९, तर गडचिरोली जिल्ह्यातून ११ हजार ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, नोंदणीकरिता विहित फाॅर्म (नमुना-१८ व नमुना-१९) संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त बिदरी यांनी केले आहे. २५ नाव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. मतदारांची यादी ३० डिसेंबर, २०२५ रोजी प्रसिद्ध होईल.

मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अद्यापपर्यंत अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधरांनी तत्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

निवडणूक जाहीर होईपर्यंत करता येणार नोंदणी

६ नोव्हेंबरपर्यंत ज्यांनी मतदार नोंदणी केली, त्यांची प्रारूप यादी ३० डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. पदवीधर मतदारांना निवडणूक जाहीर होईपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. निवडणूक जाहीर व्हायला अजूनवेळ असला, तरी पदवीधर मतदारांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Graduate Constituency: Voter List Renewal Underway; 1,22,233 Registrations Received

Web Summary : Nagpur division begins updating graduate voter lists. Over 1.22 lakh registrations received, including online applications. Registration is open until elections are announced. The draft list publishes December 30; register promptly.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणुक 2022nagpurनागपूरElectionनिवडणूक 2024Votingमतदान