सेवानिवृत्त शिक्षकांनी मांडल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:54+5:302021-01-13T04:18:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : उच्च श्रेणी प्राथमिक मुख्याध्यापक संघटना व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभेच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण ...

Problems posed by retired teachers | सेवानिवृत्त शिक्षकांनी मांडल्या समस्या

सेवानिवृत्त शिक्षकांनी मांडल्या समस्या

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : उच्च श्रेणी प्राथमिक मुख्याध्यापक संघटना व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभेच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांची नुकतीच भेट घेत त्यांच्याकडे समस्या मांडल्या. विविध समस्यांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन साेपविले.

सन २००६ ते २००९ मध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना सुधारित पेन्शन देण्यात यावी, गटविम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षकांना ८० ते ८५ वर्षे झालेले असल्यास त्यांच्या पेन्शनमध्ये १० ते १५ टक्के वाढ करावी, एकाच वेतन श्रेणीत २४ वर्षे सेवा झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या आयाेगानुसार देय असलेल्या प्रथम हप्त्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, २००६ नंतर नियुक्त झालेल्या केंद्रप्रमुखांना पदाेन्नतीची एक वेतनवाढ देण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन महिन्याच्या ५ तारखेपर्यंत करण्यात यावी व पेन्शन अदालत सुरू करण्यात यावे, आदी समस्या निवेदनातून मांडल्या. यावेळी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांशी चर्चा करताना या समस्या साेडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक महासभेचे सरचिटणीस दीपक सावळकर, सचिव आर. बी. काटे, दीपक तिडके, श्यामसुंदर कुवारे व इतर पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Problems posed by retired teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.