बँकांच्या असहकारामुळे महिला बचतगट अडचणीत

By Admin | Updated: May 10, 2014 01:24 IST2014-05-10T01:24:57+5:302014-05-10T01:24:57+5:30

बँकांकडे शेकडो प्रकरणे प्रलंबित नागपूर : ग्रामीण भागातील महिला सक्षम व आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाच्या जीवनन्नोती अभियानाच्या माध्यमातून

The problem of women's self-help group due to non-cooperation of banks | बँकांच्या असहकारामुळे महिला बचतगट अडचणीत

बँकांच्या असहकारामुळे महिला बचतगट अडचणीत

 

जिल्हा परिषद : बँकांकडे शेकडो प्रकरणे प्रलंबित

जिल्हा परिषद : बँकांकडे शेकडो प्रकरणे प्रलंबित नागपूर : ग्रामीण भागातील महिला सक्षम व आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाच्या जीवनन्नोती अभियानाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. परंतु बँकांनी असहकार पुकारल्याने महिला बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेंतर्गत महिला बचत गटांना अनुदान दिले जात होते. या योजनेत बदल करण्यात आला आहे. आता ग्रामीण जीवनन्नोती अभियानांतर्गत व्याजावर अनुदान दिले जाते.
नागपूर जिल्ह्यात ६५00 महिला बचतगट आहेत. यातील ८00 गटांनी राष्ट्रीय बँकाकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. यातील बहुसंख्य प्रस्ताव मागील काही महिन्यांपासून प्रलंबित आहेत. महिला सक्षमीकरणासाठी बचतगटांना आर्थिक सहाय्य करण्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहे. असे असतानाही बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.
एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बंद पडलेले बचतगट पुनर्जीवित करणे, नवीन गटांची स्थापना करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ११९ गट पुनर्जीवित तर २२४ नवीन गटांची स्थापना करण्यात आली आहे. परंतु बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.
विविध योजनात महिलांचा सहभाग वाढावा. यासाठी तालुका स्तरावर प्रत्येकी दोन समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बचत गटांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन व व्याज सवलतीची माहिती दिली जाते. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. मकरंद नेटके यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: The problem of women's self-help group due to non-cooperation of banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.