४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता
By Admin | Updated: July 13, 2014 00:58 IST2014-07-13T00:58:04+5:302014-07-13T00:58:04+5:30
मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नसला तरी येत्या ४८ तासात नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता
छत्तीसगडमध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय
नागपूर : मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नसला तरी येत्या ४८ तासात नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
छत्तीसगडमध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. विदर्भातही याचे परिणाम जाणवू लागले आहे. उपराजधानीत शनिवारी सकाळी काही मिनिटे पाऊस झाला. काळे ढग पाहून मुसळधार पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. परंतु काही वेळातच काळे ढग नाहिसे झाले. आकाशात ढग दाटून येत असल्याने तापमानात उल्लेखनीय कमी झालेली आहे. किमान तापमान सामान्यपेक्षा एक डिग्री खाली आले असून ३०.९ डिग्री सेल्सिअसवर पोहचले आहे. शनिवारी ०.८ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील वाशिममध्ये सर्वाधिक १३ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. गोंदियामध्ये ११.६ मी.मी., अकोला ४.१ मी.मी. , ब्रह्मपुरी १.८ मी.मी. चंद्रपूर ७ मी.मी. यवतमाळ ४.८ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)