लीलाताई देशपांडे स्मृती चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:12 IST2021-08-28T04:12:03+5:302021-08-28T04:12:03+5:30

यंदा या स्पर्धेचा विषय ‘स्वर्णिम विजय वर्ष : १९७१ च्या भारत-पाक युद्धाचे ५० वे वर्ष’ हा होता. वर्ग ३ ...

Prizes awarded by Lilatai Deshpande Memorial Painting Competition | लीलाताई देशपांडे स्मृती चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार प्रदान

लीलाताई देशपांडे स्मृती चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार प्रदान

यंदा या स्पर्धेचा विषय ‘स्वर्णिम विजय वर्ष : १९७१ च्या भारत-पाक युद्धाचे ५० वे वर्ष’ हा होता. वर्ग ३ ते वर्ग ६ व वर्ग ७ ते वर्ग १० अशा दोन गटात ही स्पर्धा हाेती. स्पर्धेत अद्रीजा नाग व गुंजन शर्मा यांना प्रथम, भार्गवी हटवार व आकर्ष गडपाल यांना द्वितीय तर गीतांश साबळे व वेदांत काटकर या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ओम शेंद्रे व तनुश्री ढोरे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पुरस्कार तर प्रीती भौमिक, अंकित पिल्ले, भव्य, अमन रक्षक, अवंतिका घोष, सात्विक देशपांडे, विराज वैद्य, शंतनू वानखेडे, अवनी राेमडे, ध्रुव गवळी, नकुल काकडे, प्रीती भड, पौर्णिमा मोरे, राजकन्या बम्होरे, घेमराज सकोडे, मोहित निकाजू, कामिनी श्रगर, अजय चौधरी, प्रणाली घोडसे व नकुल काकडे यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. यावेळी शमा देशपांडे, फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, विवेक गर्गे, विजय कुमराहे उपस्थित होते.

............

Web Title: Prizes awarded by Lilatai Deshpande Memorial Painting Competition