शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोविड १९ आयसोलेशन युनिट्ससाठी नागपुरातील खाजगी हॉस्पिटल्स तयार नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 07:00 IST

कोरोना विषाणूने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत सरकारने खाजगी इस्पितळांना सज्ज राहण्याचे आवाहन केले असून, आयसोलेशन युनिट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र, अन्यान्न कारणाने आयसोलेशन युनिट तयार करण्यासाठी खाजगी इस्पितळे असहाय असल्याचे दिसून येत आहे.

मेहा शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत सरकारने खाजगी इस्पितळांना सज्ज राहण्याचे आवाहन केले असून, आयसोलेशन युनिट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र, अन्यान्न कारणाने आयसोलेशन युनिट तयार करण्यासाठी खाजगी इस्पितळे असहाय असल्याचे दिसून येत आहे.सरकारची मदत करण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. मात्र, आयसोलेशन युनिटसाठी वेगळी जागा आमच्याकडे नसल्याचे कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. उदय माहूरकर यांनी सांगितले. अनेक खाजगी इस्पितळे छोटे असून, रहिवासी भागात असल्याने त्या भागात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका असल्याची भिती डॉ. जय देशमुख यांनी व्यक्त केली. शिवाय, लहान इस्पितळांकडे आवश्यक असे उपकरणेही नसल्याचे ते म्हणाले. तरीदेखील ५० टक्के स्टाफ क्षमतेसोबत काम करण्यास तयार असल्याचे देशमुख म्हणाले. स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूशनचे संचालक डॉ. हर्षवर्धन मार्डिकर यांनीही याबाबत मत व्यक्त केले. वेंटिलेटरची सुविधा असलेले कोणतेही इस्पितळ कोरोना संक्रमित रुग्णांसाठी आपत्कालिन युनिट म्हणून काम करू शकते. परंतु, यावेळी २० टक्के रुग्णांकरिता वेंटिलेटरची गरज आहे. नागपुरातील खाजगी इस्पितळांकडे आयसोलेशन युनिट्स नाहीत. मात्र, त्यांच्याकडे पुरेसा वेळ असल्याने ही सुविधा उपलब्ध करता येऊ शकते. तरीदेखील सरकारने लंडनच्या एक्सेल सेंटरच्या धर्तीवर स्वत:ची अशी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मार्डिकर म्हणाले. आॅरेंजसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनूप मरार यांनी आमचे हॉस्पिटल या स्थितीशी सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगितले. मात्र, नागपुरातील जवळपास सर्वच हॉस्पिटल्स आयसोलेशन नियमानुसार बनलेले नाही, असे ते म्हणाले. यावरून नागपुरात सध्या वैद्यकीय व्यवस्था प्रत्येक स्तरात कमजोर असल्याचे सिद्ध होते.आर्थिकदृष्ट्या कठीण - अशोक अर्बटडॉ. अशोक अर्बट यांनी डब्ल्यूएचओ व आयसीएमआरने कोरोनासंदर्भात सगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वेगळे प्रवेशद्वार असणे गरजेचे आहे. डॉक्टर व स्टॉफलाही नियमानुसार राहावे लागेल. पीपीई व एन-९५ मास्क सर्वांसाठीच असणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या बघितले तर हे काम कठीण आहे. एका मास्कची किंमत हजार ते १२०० रुपये एवढी आहे. शिवाय अन्य सुविधाही उपलब्ध कराव्या लागणार असल्याचे अर्बट यांनी सांगितले.वेगळे इस्पितळ बनविण्याची गरज!डॉ. श्रीकांत मुकेवार यांच्या मनानुसार अशा स्थितीत वुहान मॉडेल किंवा इटली मॉडेल आत्मसात करण्याची गरज आहे. या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे झपाट्याने होत असलेले संक्रमण बघता वेगळे इस्पितळे बनविण्यात आली आहे. डॉ. राजू खंडेलवार यांनी खाजगी वैद्यकीय सेवेला सरकार कधीही मदत मागू शकते, तो सरकारचा अधिकारच आहे. मात्र, समस्या मोठ्या आहेत. अनेक हॉस्पिटल्स नागरिक क्षेत्रात आहेत. तेथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वच परिसर क्वॉरंटाईन करावे लागेल. शिवाय, पीपीई कीट व मास्क उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत खाजगी इस्पितळे अशा सुविधा कशा उपलब्ध करतील, हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने सर्वच हॉस्पिटल्स आपल्या अधिकारात घेणे गरजेचे असल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस