शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात खासगी बसची सफाई कर्मचाऱ्याला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:30 IST

महापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत असलेले ऐवजदार सफाई कर्मचारी आनंद चिरकूट लिंगायत यांना मंगळवारी सकाळी सैनी ट्रॅव्हल्स बसने धडक दिली. बसचे समोरील चाक दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदोन्ही पायावरुन चाक गेले :मेडिकलमध्ये जखमीवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत असलेले ऐवजदार सफाई कर्मचारी आनंद चिरकूट लिंगायत यांना मंगळवारी सकाळी सैनी ट्रॅव्हल्स बसने धडक दिली. बसचे समोरील चाक दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आनंद लिंगायत हे प्रभाग १९ मध्ये कार्यरत असून सकाळी ७.३० सफाईच्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील दखणे चौक येथे सैनी ट्रॅव्हल्सची एमएच ४९ एटी ४५३५ क्रमांकाची बस यू टर्न घेत होती. सकाळची वेळ असल्याने मार्गावर वर्दळ नव्हती. त्यामुळे बस चालकाने वेगाने यू टर्न घेतला. यात लिंगायत बसच्या समोरील चाकात आले. त्यांच्या पायावरुन बसचे चाक गेले. एक पाय पूर्णपणे निकामी झाला. दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झाली. ड्युटीवरील अन्य कर्मचारी व नागरिकांनी लिंगायत यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा होतो.घटनेची माहिती मिळताच आमदार विकास कुंभारे, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, नगरसेवक अ‍ॅड.संजय बालपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, महापालिका कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष राजेश हाथीबेड यांच्यासह अधिकारी मेयो रुग्णालयात पोहचले. त्यांनी ऐवजदार कर्मचाऱ्याची माहिती घेतली. मेयो रुग्णालयात आवश्यक उपचार न मिळाल्याने मेडिकलला हलविण्यात आले. लिंगायत यांना तीन मुली आहेत. दोघींचा विवाह झालेला आहे तर एक एमबीए करीत आहे.लिंगायत कामावर असताना गंभीर जखमी झालेले असल्याने उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिकेकडून मिळाला पाहिजे, तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपावर नियुक्ती दिली पाहिजे, अशी मागणी राजेश हाथीबेड यांनी केली. लिगायत यांचे पाय निकामी झाले आहे. त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे असेही हाथीबेड म्हणाले.अधिकारी -कर्मचाऱ्यांकडून २५ हजाराची मदतआनंद लिंगायत यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केल्यानंतर अपर आयुक्त अजीज शेख, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार रुग्णालयात पोहचले. त्यांनी उपचाराची माहिती घेतली. याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकून आर्थिक मदत जमा केली. सायंकाळपर्यत २५ हजाराची रक्कम लिंगायत यांच्या कुटुंबीयांना दिली. सैनी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तहसील पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऐवजदारांना नुकसान देण्याबाबतची कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. असे असूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २५ हजार जमा केले. अशा प्रसंगात मदतीसाठी कार्पोरेट फं ड निर्माण करण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती दासरवार यांनी दिली.खासगी बसपासून मुक्तता मिळावीगीतांजली टॉकीज व टाटा पारसी स्कूल परिसरात खासगी बसच्या रांगा लागतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अनेकदा अपघात होतात. असाच प्रकार मंगळवारी घडला. संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस येथून तात्काळ हटविण्यात याव्यात, अशी मागणी संजय बालपांडे यांनी केली.

टॅग्स :AccidentअपघातEmployeeकर्मचारी