लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आयआयटी धनबादच्या बी. टेक पेट्रोलियम इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि नागपूरचा रहिवासी पृथ्वी चौहानने लंडनमध्ये आयोजित इंटरनॅशनल स्टुडंट समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून ग्लोबल वार्मिंगवर चिंता व्यक्त केली. ग्लोबल वार्मिंगचा धोका थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगून ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांकडे नागरिकांचे लक्ष वेधले.लंडनच्या स्टुडंट एनर्जी ग्रुपच्या वतीने इंटरनॅशनल स्टुडंट एनर्जी समिटचे आयोजन इम्पेरियल कॉलेजमध्ये केले. यात १०० पेक्षा अधिक देशातील ६५० प्रतिनिधी सहभागी झाले होते. समिटमध्ये ऊर्जा उद्योगातील मान्यवरांनी ऑईल आणि गॅसमध्ये प्रदूषण कमी करण्यावर भर दिला. पृथ्वी चौहानने ग्रीन एनर्जीला चालना देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. इनोव्हेशन जॅम नावाच्या स्पर्धेत पृथ्वीने द्वितीय क्रमांक पटकावला. पृथ्वीने कार्बन प्राईसिंगची कल्पना सुचविली. त्या सोबतच त्याने रॉयल जिओग्राफिकल सोसायटी लंडनमध्ये तेल आणि गॅस उद्योगात नॅनो औद्योगिक संशोधनावर सादरीकरण केले. कार्यक्रमात बँक, ऑईल अॅन्ड गॅसचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पृथ्वी चौहान प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट ललित चौहान यांचा मुलगा आहे.
पृथ्वी चौहानने व्यक्त केली ग्लोबल वार्मिगवर चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:36 IST
आयआयटी धनबादच्या बी. टेक पेट्रोलियम इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि नागपूरचा रहिवासी पृथ्वी चौहानने लंडनमध्ये आयोजित इंटरनॅशनल स्टुडंट समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून ग्लोबल वार्मिंगवर चिंता व्यक्त केली. ग्लोबल वार्मिंगचा धोका थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगून ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांकडे नागरिकांचे लक्ष वेधले.
पृथ्वी चौहानने व्यक्त केली ग्लोबल वार्मिगवर चिंता
ठळक मुद्देलंडनमध्ये केले भारताचे प्रतिनिधित्व