कारागृहात कैद्याचा लोखंडी पत्र्याने आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 21:26 IST2023-06-16T21:25:51+5:302023-06-16T21:26:15+5:30
Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला व कर्मचारी-अधिकाऱ्यांना आरोपात फसविण्याची धमकी दिली. या कैद्याविरोधात धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृहात कैद्याचा लोखंडी पत्र्याने आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला व कर्मचारी-अधिकाऱ्यांना आरोपात फसविण्याची धमकी दिली. या कैद्याविरोधात धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिजो चंद्रन एल. आर. चंद्रन (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो कारागृहातील कोठडी क्रमांक चारमध्ये शिक्षा भोगत आहे. १४ जून रोजी दुपारच्या सुमारास त्याने स्वत:च्या डाव्या हातावर लोखंडी पत्र्याने जखमा करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने कारागृहातील अधिकारी-कर्मचारी यांना फसविण्याची धमकीदेखील दिली. त्याला तातडीने मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कारागृहातील कर्मचारी पुंडलिक आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिस ठाण्यात चंद्रनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.