कारागृहातील बंदिवानही गहिवरले
By Admin | Updated: August 19, 2016 02:36 IST2016-08-19T02:36:12+5:302016-08-19T02:36:12+5:30
इंडियन युथ अॅण्ड वूमेन्स डेव्हलपमेंट सोसायटी व सरस्वती महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप

कारागृहातील बंदिवानही गहिवरले
जन्मठेपेच्या कैद्यांना बांधली महिलांनी राखी
नागपूर : इंडियन युथ अॅण्ड वूमेन्स डेव्हलपमेंट सोसायटी व सरस्वती महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप झालेल्या कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी येथील बंदिवानही गहिवरून गेले होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये व मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई, मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक किर्ती चिंतामणी, सुनील निघोट, वरिष्ठ तुरुंग अधिकारी बळवंत काळे, मिराशे प्रामुख्याने उपस्थित होते. यवेळी महिला सदस्यांनी उपस्थित मान्यवरांनाही राखी बांधली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांनाही राखीच्या दिवशी बहिणीची कमतरता भासू नये या उद्देशाने सुजाता प्रकाश गजभिये, जया देशमुख, आरती महाले, मनिषा पुडके, आरती बोंदरे, ज्योती चौधरी, अनिता मसराम, सुषमा साबळे, गवई, शाहू आदी महिला सदस्यांनी शेकडो कैद्यांना राखी बांधून व आरती ओवाळून औक्षण केले. तसेच संपूर्ण कारागृहात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी पंकज बोंदरे, विजय गजभिये, मनीष छबलानी, भूपेंद्र सनेश्वर, मनीष राऊत, हर्षद बोंदरे, पवन शेंडे, जितेंद्र बांते, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)