शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक विकासालाही प्राधान्य द्या : आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 11:18 PM

आदिवासी क्षेत्रासाठी उपलब्ध निधी पूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करावे, असे आदेश राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी गुरुवारी येथे राज्यस्तरीय बैठकीत दिले.

ठळक मुद्देमार्चपूर्वी निधी खर्च करण्याचे नियोजन करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी क्षेत्राच्या विकासासोबत शिक्षण, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करताना आर्थिक व सामाजिक विकासालाही प्राधान्य देण्यात यावे. त्यासोबतच आदिवासी क्षेत्रासाठी उपलब्ध निधी पूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करावे, असे आदेश राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी गुरुवारी येथे राज्यस्तरीय बैठकीत दिले.आदिवासी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाच्या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर व अमरावती विभागातील जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०१९-२० च्या खर्चाचा आढावा तसेच सन २०२०-२१ वर्षासाठीचा जिल्हा वार्षिक आराखडा अंतिम करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. आशिष जैयस्वाल, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रकाश गजभिये, आ. धर्मराव बाबा आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, विनोद पाटील, जिल्हाधिकारी दीपक सिंघला, उपसचिव सु.ना. शिंदे, अवर सचिव रवींद्र औटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, प्रकल्प अधिकारी दिगांबर चव्हाण उपस्थित होते.आदिवासी विकास योजनेंतर्गत ६० टक्के निधी यापूर्वीच सर्व जिल्ह्यांना प्राप्त झाला असून, उर्वरित ४० टक्के निधीदेखील प्राप्त झाला आहे. प्राप्त १०० टक्के निधी आदिवासी विकास कामांवर निर्धारित कालावधीत खर्च करा, असे निर्देश अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी दिले. आदिवासी विकास योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना विशेष सोयीसुविधा पुरविण्यावर भर देतानाच संबंधित जिल्ह्यांनी विकास कामांसाठी अतिरिक्त निधींची मागणी करताना त्याचे पूर्ण नियोजन करावे, जेणेकरून विकास कामांसाठी वाढीव निधी मंजूर करण्यात येईल, असेही आदिवासी विकास मंत्री यांनी यावेळी सांगितले. प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी नागपूर व अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांची माहिती दिली.

नागपूरने केला ६५ टक्के, तर अमरावती विभागाने ६६ टक्के खर्चनागपूर विभागामध्ये जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०१९-२० अंतर्गत मंजूर नियतव्यय ४०५ कोटी ८२ लाख तर विभागास प्राप्त तरतूद ३३५ कोटी ३५ लाख एवढी आहे. जानेवारी २०२० अखेर नागपूर विभागाच्या वतीने १५७ कोटी १३ लाख विभागाच्या विविध कामांवर खर्च करण्यात आले आहे. खर्चाची एकूण सरासरी टक्केवारी ६५ अशी आहे. तसेच, अमरावती विभागामध्ये सन २०१९-२० साठी मंजूर नियतव्यय ३६० कोटी २४ लाख एवढे असून प्राप्त तरतूद ३२१ कोटी ७० लाख एवढी आहे. अमरावती विभागाचा एकूण झालेला खर्च १०६ कोटी ६१ लाख एवढा असून खर्चाची एकूण टक्केवारी ६६ अशी आहे.आदिवासींचा जीवनस्तर उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवाआदिवासी उपयोजनेंतर्गत दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना सुविधा उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या जीवनस्तर उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योजना राबवा, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी यावेळी केल्यात. कृषी व पशुसंवर्धन विभागाने आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी योजनांना प्राधान्य द्यावे. यासाठी वार्षिक योजनेत निधीची तरतूद करावी. प्रत्येक गाव - वाड्यावर शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड समस्येबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात. असे निर्देश यावेळी दिलेत. आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी क्षेत्र भेटी उपक्रम राबवून त्याचा अहवाल सादर करा, असे निर्देशही आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी दिले.

टॅग्स :K. C. Padaviके. सी. पाडवीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना