शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

रेल्वेतून मद्याची तस्करी करणाराची 'प्रिंस'ने केली पोलखोल; अंदमान एक्सप्रेसमधून करीत होता तस्करी 

By नरेश डोंगरे | Updated: March 9, 2024 19:28 IST

मध्य प्रदेशमधील प्रतिबंधित आणि स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या घेऊन 'तो' आंध्र प्रदेशकडे निघाला.

नागपूर: मध्य प्रदेशमधील प्रतिबंधित आणि स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या घेऊन 'तो' आंध्र प्रदेशकडे निघाला. प्रवासात नागपूर दरम्यान त्याने रेल्वेतील डब्यात बसलेल्या अनेक प्रवाशांना चकमा देण्यात यश मिळवले. मात्र, प्रिंस नामक श्वानाने या मद्य तस्काराचा डाव उलटवला आणि त्याला पोलिसांच्या कोठडीत पोहचवले. रवी अनिल (वय २७) असे आरपीएफने पकडलेल्या मद्य तस्कराचे नाव आहे. तो आंध्र प्रदेशमधील गुंटूरचा रहिवासी आहे.

मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी नकली दारू तयार करून ती ब्राण्डेड मद्याच्या बाटल्यात भरली जाते. ही दारू आरोग्यास अपायकारक असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यात तिच्यावर प्रतिबंध आहे. मात्र, स्वस्त किंमतीत ती सहज उपलब्ध असल्याने ठिकठिकाणचे मद्य तस्कर ही नकली दारू बोलवून विविध शहरातील ग्राहकांना विकतात. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्येही रेल्वे गाड्यांमधून या दारूची तस्करी केली जाते. रवी अनिल यानेही अशाच प्रकारे मध्य प्रदेशमधून दारूच्या ११८ बाटल्या खरेदी करून त्या तीन बॅगमध्ये भरल्या आणि तो ट्रेन नंबर १६०३२ च्या कोच नंबर ए-१ मध्ये बसला. बर्थ खाली त्याने दारू भरलेल्या बॅग दडवल्या. 

ही गाडी सकाळी ९.३० नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर आली. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) विपीन सातपुते, निरज यांनी प्रिन्स नामक श्वानासह रेल्वे डब्याची तपासणी सुरू केली. बर्थ नंबर ३६ जवळून जाताना प्रिन्सला खाली असलेल्या दडवून असलेल्या बॅगमधून अंमली पदार्थाचा गंध आला. त्याने तसे संकेत त्याच्या हॅण्डलरला दिले. त्यामुळे आरपीएफच्या जवानांनी या बॅग बाहेर काढून त्या कुणाच्या आहेत, त्याबाबत विचारपूस केली असता रवी अनिल पुढे आला. त्याने बॅगमध्ये कपडे आणि ईतर साहित्य असल्याचे सांगून जवानांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रिन्सने बॅगमध्ये काही तरी वेगळे असल्याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे पंचासमोर त्या बॅग उघडण्यात आल्या असता त्यातून तब्बल ११८ दारूच्या बाटल्या निघाल्या. प्रकरण उत्पादन शुल्क विभागाकडेया दारूच्या बाटल्या जप्त करून पुढच्या कारवाईसाठी त्या बाटल्या आणि आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे (स्टेट एक्साईज) सोपविण्यात आले. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील अनेक शहरातून प्रतिबंधित दारू नागपूर मार्गे महाराष्ट्रातील विविध शहरात आणि आजुबाजुच्या प्रांतातही पोहचवली जाते. त्यासाठी तस्करांकडून विविध वाहनांचा उपयोग केला जातो. कधी कधी पोलीस ही दारू पकडतात. मात्र, राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे अधिकारी याकडे कानाडोळा करतात. कोणतीही मोठी कारवाई त्यांच्याकडून केली जात नाही.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे