लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.५० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे. तत्पूर्वी स्टेशनवर महामेट्रोतर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
- दुपारी ४.२० मिनीट औरंगाबादहून नागपूर विमानतळावर आगमन
- दुपारी ४.५० वाजता सुभाषनगर मेट्रो स्थानकावर आगमन
- दुपारी ४.५५ वाजता महामेट्रोच्या प्रदर्शनीचे उद्घाटन
- सायंकाळी ५ वाजता लोकमान्य नगर ते सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो मार्गाचे लोकार्पण
- सायंकाळी ५.०२ वाजता सुभाषनगर मार्गाहून मेट्रो प्रवासाला सुरुवात
- सायंकाळी ५.२० वाजता सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्थानकावर आगमन
- सायंकाळी ५.३० वाजता सिताबर्डीहून मानकापूर इन्डोअर स्टेडिअमकडे प्रस्थान
- सायंकाळी ५.५० वाजता मानकापूर येथे कार्यक्रमस्थळी आगमन
- सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात
अद्याप मार्ग निश्चित नाहीसिताबर्डी येथून मानकापूर इन्डोअर स्टेडियमकडे पंतप्रधान रस्तेमार्गानेच जाणार आहेत. मात्र ते नेमक्या कुठल्या मार्गाने जातील हे अद्याप निश्चित झालेले नाही. सिताबर्डीहून ते थेट सदरमार्गे मानकापूरकडे जाऊ शकतात. परंतु तेथे काम सुरू असल्याने महाराजबाग चौक, आकाशवाणी चौक या मार्गाने काटोल मार्ग चौक व तेथून पुढे मानकापूर स्टेडियमकडेदेखील जाऊ शकतात. यासंदर्भात सुरक्षायंत्रणांकडून संपूर्ण चाचपणी झाल्यानंतरच अंतिम मार्ग निश्चित करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.