प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे; वैंकय्या नायडू यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:29 IST2020-01-10T11:34:11+5:302020-01-10T12:29:47+5:30

प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले.

Primary education should be through mother tongue; Explicit opinion of Venkaiah Naidu | प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे; वैंकय्या नायडू यांचे मत

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे; वैंकय्या नायडू यांचे मत

ठळक मुद्दे१११ ग्रंथांच्या दिडींचे लोकार्पण


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले.  कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मातृभाषा ही आपले डोळे आहेत आणि इतर भाषा म्हणजेचष्मा. जर डोळे नसतील तर चष्मा काय कामाचा ? आपण आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे मूल्ये ढासळत आहेत. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवे. जर संस्कृती विसरले तर देश प्रगती कसा करेल. वेद, संस्कृत कुठल्याही जातीची मालमत्ता नाही. प्रत्येकाला त्याचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे.

 याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 

Web Title: Primary education should be through mother tongue; Explicit opinion of Venkaiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.