शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात चोरटा बनला मंदिराचा पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:31 IST

वाहनधारकांच्या डोळ्यात धूळ झोकून ठिकठिकाणी चोऱ्या करत फिरणारा नागपुरातील कुख्यात चोरटा छत्तीसगडमध्ये दडून बसला. तेथे तो चक्क एका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. या नाट्यमय घडामोडीची माहिती कळताच पाचपावली पोलिसांनी त्याला तेथे जाऊन अटक केली आणि खळबळ उडवून दिली.

ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये अटक : पाचपावली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनधारकांच्या डोळ्यात धूळ झोकून ठिकठिकाणी चोऱ्या करत फिरणारा नागपुरातील कुख्यात चोरटा छत्तीसगडमध्ये दडून बसला. तेथे तो चक्क एका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. या नाट्यमय घडामोडीची माहिती कळताच पाचपावली पोलिसांनी त्याला तेथे जाऊन अटक केली आणि खळबळ उडवून दिली.शकील पठाण शरीफ पठाण (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. तो यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. कुख्यात वाहनचोरटा असलेल्या शकीलविरुद्ध पाचपावली ठाण्यात वर्षभरापूर्वी वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. तो १० महिन्यांपासून छत्तीसगडमधील डोंगरगडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक डोंगरगडमध्ये पोहचले. त्यांनी शकीलचा पत्ता शोधून काढला. मात्र, पोलीस तेथे जेव्हा पोहचले तेव्हा शकीलचे रूप पाहून काही वेळेसाठी पोलीसही चक्रावले. आरोपी शकील भगवा फेटा बांधून कपाळावर टिळा लावून होता. तो एखाद्या पंडितसारखा दिसत होता. दशरथ ठाकूर नामक व्यक्तीच्या घरी तो भाड्याने राहायचा. त्याने स्वत:चे नाव रजनिश सिंग असे सांगितले होते. त्याच नावाने तो एका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. त्याचे हे रूप आणि व्यवसाय पाहून पोलीस चाट पडले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन नागपुरात आणले. त्याच्याकडून एक अ‍ॅक्टिव्हा, एक स्कुटी पेप आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला.परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक रवींद्र दुबे, उपनिरीक्षक आर. इंगळे, हवालदार संजय वानखेडे, नायक सारिपुत्र फुलझेले, शैलेंद्र चौधरी, अविराज भागवत, सचिन भिमटे यांनी ही कामगिरी बजावली.---जॉली एलएलबीची आठवणकुख्यात शकीलची अटक जॉली एलएलबी या चित्रपटातील कथानकाची आठवण करून देणारी आहे. जॉली एलएलबी या चित्रपटातील एक काश्मिरी गुन्हेगार स्वत:ची ओळख लपविण्यासाठी वेशांतर करतो. मुस्लीम असून तो स्वत:ला पंडित असल्याचे सांगतो. मात्र, न्यायालयात दाखल झालेले पोलीस त्याचा बुरखा फाडतात. शकीलचा बुरखा अशाच प्रकारे पाचपावली पोलिसांनी फाडला आहे.---

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर