महिला दिनी महिला पत्रकारांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:57+5:302021-03-09T04:09:57+5:30

- शत्रुघ्न सिन्हा, पहलाज निहलानी यांच्या हस्ते सन्मान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रख्यात अभिनेता व माजी केंद्रीय मंत्री ...

Pride of women journalists on Women's Day | महिला दिनी महिला पत्रकारांचा गौरव

महिला दिनी महिला पत्रकारांचा गौरव

- शत्रुघ्न सिन्हा, पहलाज निहलानी यांच्या हस्ते सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रख्यात अभिनेता व माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा व केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाचे माजी अध्यक्ष, चित्रपट दिग्दर्शक पहलाज निहलानी यांच्या हस्ते नागपुरातील महिला पत्रकारांचा सन्मान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आला.

टिळक पत्रकार भवन, श्रमिक पत्रकार संघटना व प्रेस क्लबच्या वतीने सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या सभागृहात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी शत्रुघ्न सिन्हा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पहलाज निहलानी, मुख्य आयकर आयुक्त रुबी श्रीवास्तव, ज्येष्ठ पत्रकार सर्वमित्रा सुरजन, एस.एन. विनोद, माजी आमदार आशीष देशमुख उपस्थित होते.

यावेळी महिला पत्रकार मेघना देशपांडे, कल्पना नळसकर, मीनाश्री हेडाऊ व डॉ. सीता पांडे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उषा मिश्रा यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शोभा विनोद स्मृती वुमन जर्नालिस्ट ऑफ दी इयर हा पुरस्कार पत्रकार सरिता कौशिक यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीपकुमार मैत्र यांनी केले. संचालन वर्षा बासू यांनी केले तर आभार जोसेफ राव यांनी मानले.

..............

Web Title: Pride of women journalists on Women's Day