वाळू तस्करी रोखा, अन्यथा कारवाई ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:37+5:302021-02-05T04:55:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाळू तस्करी रोखा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश ...

वाळू तस्करी रोखा, अन्यथा कारवाई ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाळू तस्करी रोखा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. जिल्ह्यात वाळू तस्करी रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी बुधवारी चांगलेच फटकारले. तस्करी बंद करण्याचे निर्देश दिले. तसे न झाल्यास कारवाईचा इशारा दिला. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसापासून शहरात वाळू तस्करी वाढली आहे. यात काही अधिकारीही सामील असल्याचे सांगितले जाते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाळू तस्करीची बाब गांभीर्याने घेत वाहतूक शाखेचे डीसीपी आणि अजनी, सक्करदरा, कामठीतील पोलीस निरीक्षक तसेच कामठी, कळमना, पारडी, वाठोडा, नंदनवन आणि बेलतरोडीतील ठाणेदारांना बोलावून घेतले. यावेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फटकारले. वाळू तस्करी तात्काळ बंद करण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश दिले. वाळू माफियांना संरक्षण देणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जे अधिकारी यात आढळून येतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. रात्रीच्या वेळी वाळू माफियांची वाहने धावतात. पोलिसांना याची माहिती होत नाही, हे शक्य नाही. पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बॉक्स
ग्रामीण भागात सर्रास व्यापार
ग्रामीण भागात वाळू तस्करी सर्रास सुरू आहे. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातून वाळूची तस्करी केली जाते. वाळू माफियांना आरटीओचेही संरक्षण आहे. वाळू माफिया हे आरटीओच्या कमाईचे मोठे साधन आहे.