शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

राष्ट्रपती कोविंद यांची दीक्षाभूमीवरील २१ मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:20 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या दीक्षाभूमी दौºयानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दीक्षाभूमीवर सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी आगमन झाल्यानंतर तब्बल २१ मिनिटे ते दीक्षाभूमीवर थांबले होते. अस्थिकलश व तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर दीक्षाभूमीचे अवलोकनही केले. १० वाजून ४६ मिनिटाला त्यांनी रामटेकसाठी प्रयाण केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या दीक्षाभूमी दौºयानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दीक्षाभूमीवर सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी आगमन झाल्यानंतर तब्बल २१ मिनिटे ते दीक्षाभूमीवर थांबले होते. अस्थिकलश व तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर दीक्षाभूमीचे अवलोकनही केले. १० वाजून ४६ मिनिटाला त्यांनी रामटेकसाठी प्रयाण केले. जाताना बाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांना अभिवादन केले.कोविंद दुसरे राष्टÑपतीनागपूरच्या दीक्षाभूमीला भेट देणारे रामनाथ कोविंद हे दुसरे राष्टÑपती आहेत. यापूर्वी राष्टÑपती के. आर. नारायणन यांनी १८ डिसेंबर २००१ रोजी दीक्षाभूमीला भेट दिली होती. त्यांच्या हस्ते दीक्षाभूमी स्मारकाचे लोकार्पण झाले होते. विशेष म्हणजे, २७ सप्टेंबर २००३ रोजी उपराष्टÑपती भैरोसिंह शेखावत यांनी तर श्रीलंकेचे राष्टÑपती प्रेमदासा यांनी १५ एप्रिल १९९३ रोजी दीक्षाभूमीला भेट दिली होती.आठवले यांनी घेतली धावकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दीक्षाभूमीवर यायला उशीर झाला. सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनी शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्या मार्गाने दीक्षाभूमीकडे जात असताना पोलिसांनी त्यांचे वाहन थांबविले. यामुळे त्यांनी पायीच दीक्षाभूमीकडे धाव घेतली. त्यावेळी राष्टÑपती कोविंद आपल्या वाहनाकडे जात असताना आठवले यांनी त्यांची भेट घेतली.स्मारक समितीच्या सदस्यांना आमंत्रणराष्टÑपती कोविंद यांनी दीक्षाभूमीचे स्मारक व येथील वातावरणाबाबत प्रसन्नता व्यक्त केली. दीक्षाभूमीवर ते २१ मिनिटे उपस्थित होते. या वेळात ते अधिक काही बोलले नाही. मात्र निघताना त्यांनी स्मारक समितीचे सदानंद फुलझेले व विलास गजघाटे यांच्यासह समितीच्या सदस्यांना राष्टÑपती भवनात येण्याचे आमंत्रण दिले.विमानतळावर राष्टÑपतींचे स्वागतराष्ट्रपती कोविंद यांचे सकाळी १० वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार आदींनी त्यांचे स्वागत केले.यहा आकर अपार प्रसन्नता हुई...‘परमपूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि समाजक्रांतीचा पाया या पवित्र भूमीवर रचला. ज्यामुळे भारतीय तसेच संपूर्ण मानव समाज प्रगतीच्या मार्गात अग्रेसर होऊ शकला. ही पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवतेची प्रेरणा देते. मला येथे येऊन अपार प्रसन्नता होत आहे’. या शब्दात राष्टÑपती कोविंद यांनी आपल्या भावना दीक्षाभूमीवरील अभिप्राय पुस्तिकेतून मांडली. त्यानंतर त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्तुपाच्या वरील बाजूला असलेल्या ध्यान केंद्रालाही भेट दिली.अ‍ॅम्ब्युलन्सला दिला मार्गदीक्षाभूमी चौकातील वाहतूक दोरीने अडवून ठेवण्यात आली होती. पायी चालणाºयांनासुद्धा थांबवून ठेवले होते. याला घेऊन पोलीस आणि एका महिलेमध्ये वाद सुरू असताना नीरी कॉलनी मार्गाने एक अ‍ॅम्ब्युलन्स आली. पोलिसांनी तात्काळ वाहतूक बाजूला करीत लावलेली दोरी काढून अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.