खोटा नकाशा तयार केला अन् प्लॉट विकून पैसा कमावला
By दयानंद पाईकराव | Updated: July 17, 2024 15:27 IST2024-07-17T15:24:37+5:302024-07-17T15:27:51+5:30
Nagpur : भुखंडाचा खोटा नकाशा तयार करून लाखोंची फसवणूक

Prepared a fake map and earned money by selling plots
दयानंद पाईकराव
नागपूर : भुखंडाचा खोटा नकाशा तयार करून त्यावर प्लॉट दाखवित आरोपीने एका व्यक्तीला प्लॉट विकून ४२ लाखांनी गंडविले. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ नोव्हेंबर २०२२ ते ३० जून २०२४ दरम्यान घडली.
शरद वसंतराव गुडधे (५०, रा. शांतीनिकेतन कॉलनी, कोतवालनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने मौजा दाभा, खसरा नं. २७/४/१ येथील दोन भुखंड हे स्वत:च्या मालकीचे आहे असे भासवुन भुखंडाचा खोटा नकाशा तयार केला. त्यानंतर आरोपीने आपल्या साथीदारांसह भुखंडावरील प्लॉट सुभाष रुपचंद मंगतानी (४८, रा. साईबाबा टॉवर पाचपावली) यांना ४२ लाख १० हजार रुपयात विकला. आरोपींनी इतरही प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून नागरिकांची फसवणुक केली व त्यांच्याकडून गुंतवणुकीची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगतानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.