शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

नागपुरातील  पावसाळी अधिवेशनाची तयारी संशयाच्या घेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:49 PM

१९७१ नंतर नागपुरात पहिल्यांदा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्रतयारीसाठी होत असलेली कामे संशयाच्या घेऱ्यात आली आहेत. आमदार निवासमध्ये होत असलेली कामे तर रडारवर आहेत. कारण येथील बहुतांश कामाच्या निविदा ४५ टक्क्यांपर्यंत कमी दराने मंजूर करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्लास देबडवार यांनी संबंधित प्रकरण गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्दे४५ टक्के कमी दरात दिली कामे : मुख्य अभियंत्याचे चौकशीचे आदेश

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७१ नंतर नागपुरात पहिल्यांदा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्रतयारीसाठी होत असलेली कामे संशयाच्या घेऱ्यात आली आहेत. आमदार निवासमध्ये होत असलेली कामे तर रडारवर आहेत. कारण येथील बहुतांश कामाच्या निविदा ४५ टक्क्यांपर्यंत कमी दराने मंजूर करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्लास देबडवार यांनी संबंधित प्रकरण गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.नागपूर करारांतर्गत दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात होणे आवश्यक आहे. १९७१ नंतर हिवाळी अधिवेशन ही नागपूरची ओळख बनले होते. २०१७ च्या डिसेंबरमध्येही येथेच हिवाळी अधिवेशन झाले. मात्र, मुंबईच्या आमदार निवासात होत असलेले बांधकाम पाहता यावर्षी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीने या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत अधिवेशनाची तयारी सुरू केली. आमदार निवासासोबतच विधानभवन, रविभवन आदी ठिकाणी युद्धपातळीवर विकासकामे सुरू झाली.आमदार निवासात आमदारांसाठी आवश्यक सोयी केल्या जात आहेत. मात्र, आता हेच काम संशयाच्या भोवºयात अडकले आहे. पेंटिंग, कामगारांचा पुरवठा, पॉलिशिंग यासह पाणीपुरवठ्यासारखी महत्त्वपूर्ण कामे कंत्राटदारांकडून करवून घेतली जात आहेत. ही सर्व कामे निविदेच्या निश्चित दरापेक्षा ४५ टक्के कमी दराने देण्यात आली आहेत. शंभर रुपयात होणारे काम जर कुणी ५५ रुपयात करीत असेल तर त्या कामाची गुणवत्ता कशी राखली जाईल, असा सवाल सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.सहा महिन्यात दुसऱ्यांदा कामनोव्हेंबर २०१७ मध्ये हिवाळी अधिवेशनासाठी आमदार निवास चकाचक करण्यात आले होते. फर्निचरला पॉलिश करून नवे रुप देण्यात आले होते. पडदे, चादर, गाद्या बदलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा सहा महिन्यांनी तेच काम केले जात आहे.चौकशी करून अहवाल देणार मुख्य अभियंता यांच्या आदेशावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक निविदेची कागदपत्रे कनिष्ठ अभियंत्याकडून मागविण्यात आली आहेत. या निविदांची पडताळणी केली जाईल. लवकरच मुख्य अभियंता यांना अहवाल सादर केला जाईल. प्रशांत नवघरे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागनव्या तंत्रज्ञानाचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित सूत्रांचा असा दावा आहे की कुठलाही घोळ झालेला नाही. कंत्राटदारांनी निविदेत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून काम करण्याचा दावा करीत कमी दराने निविदा स्वीकारली आहे. नव्या तंत्रत्रानामुळे खर्च कमी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.नागपुरात झालेले पावसाळी अधिवेशनवर्ष            कालावधी१९६१      १४ जुलै ते ३० आॅगस्ट१९६६     २९ आॅगस्ट ते ३० डिसेंबर१९७१       ६ डिसेंबर ते ११ आॅक्टोबर२०१८      ४ जुलैपासून प्रारंभ

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाnagpurनागपूर