विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: September 7, 2014 00:57 IST2014-09-07T00:57:15+5:302014-09-07T00:57:15+5:30
गणेश विसर्जनाठी भाविकांना सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनासाठी ठिकठिकाणी ९५ कृत्रिम तलाव व १२ कृत्रिम टाके निर्माण करण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी निर्माल्य

विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज
९५ कृत्रिम तलाव, १२ टाके : स्वयंसेवी संस्थाही मदतीला
नागपूर : गणेश विसर्जनाठी भाविकांना सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनासाठी ठिकठिकाणी ९५ कृत्रिम तलाव व १२ कृत्रिम टाके निर्माण करण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वंयसेवी संस्था मदत करीत आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाने विसर्जनाची तयारी केली आहे. यंदा सोनेगाव तलावात पुरेसा पाणीसाठा नसल्याने येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार नाही. अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो भागात मूर्तीं विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. पीओपी मूर्तींचे शहरातील कोणत्याही तलावात विसर्जन होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. विसर्जन पर्यावरण पूरक व्हावे यासाठी सेवाभावी संस्था निर्माल्य गोळा करण्याच्या कामात व कृत्रिम तलावासाठी मदत करीत आहेत. यात ग्रीन व्हीजील फाऊं डेशन, वृक्ष संवर्धन समिती, सिंधू महाविद्यालय, जनजागृती आव्हान समिती, सृष्टी पर्यावरण मंडळ, मैत्री परिवार संस्था, निसर्ग विज्ञान संस्था, रोटरी क्लब पूर्व व ईशान्य, आगाज संस्था, रोटरी क्लब नागपूर, योग संपदा संस्था, अरण्य पर्यावरण संस्था, राजेंद्र हायस्कूल इत्यादी संस्थांचे सहकार्य आहे.गोळा करण्यात आलेले निर्माल्य वाहून नेण्यासाठी कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट व्दारे कर्मचारी व वाहने उपलब्ध होणार आहे. प्रत्येक तलावावर निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्माल्यापासून गांडूळ खत निर्माण के ले जाणार आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विसर्जन सोहळा पर्यावरण पूरक व्हावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.(प्रतिनिधी)