शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर व अमरावतीसाठी वीज विकास आराखडा तयार करा

By आनंद डेकाटे | Updated: July 7, 2025 19:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : २०३५ ची विजेची गरज लक्षात घेऊन नियोजन करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूरअमरावती जिल्ह्यात उद्योग, निवासी प्रकल्प आणि वाणिज्य क्षेत्रामुळे वीज मागणी झपाट्याने वाढते आहे. नागपूर व अमरावती मधील वीज कामांसाठी मंजूर निधीतील कामे गतीने करा. तसेच सन २०३५ मध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन वीज मागणीचे नियोजन आताच करा. दोन्ही जिल्ह्यात वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

मुंबई विधानभवन येथे आयोजित नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषण आढावा तसेच कोराडी, खापरखेडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे,वित्त राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल,ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. आशिष देशमुख, आ. मोहन मते, आ. प्रविण दटके, आ. चरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  नागपूर व अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर वीज क्षेत्रातील विकासासाठी सध्या मंजूर निधीतून कामे पूर्ण करावीत आगामी कालावधीत अजनुही नवीन प्रकल्प वाढत आहेत त्यासाठी ऊर्जा विभागाने ठोस उपाययोजना करावी. नागपूर मध्ये ७१३ कोटी तर अमरावती जिल्ह्यात २४२ कोटी रूपयांचे वीज क्षेत्रातील कामांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे या निधीची तरतूद करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 

विजेच्या सुरक्षेसाठी डक्ट प्रणालीचा वापर करामुख्यमंत्री फडणवीस यांनी भुयारी केबल्सना होणाऱ्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त करीत सुरक्षित केबल डक्ट प्रणाली वापरण्याचे निर्देश दिले. तसेच सुधारित वीज क्षेत्र योजना,कुसुम-ब योजना,मागेल त्याला सौर कृषीं पंप योजना,ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ व नव्या वीज केंद्रांची उभारणी,नवीन वीज उपकेंद्राची मागणी या कामांना प्राधान्य देण्याची सूचना केली. 

उच्चस्तरीय बैठक, वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीबैठकीला मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला, सचिव श्रीकर परदेशी, पर्यावरण तथा वातावरणीय बदल सचिव जयश्री भोज,महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार,महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राधाकृष्णन बी.महाऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक डॉ.कांदबरी बलकवडे यासह दूरदृश्य प्रणाली द्वारे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर उपस्थित होते.  

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAmravatiअमरावती