शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

नागपुरात एकमेकांचा गेम करण्याची तयारी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:09 IST

मित्राने नेलेली मोटरसायकल लवकर परत आणली नाही म्हणून झालेल्या वादानंतर परस्पराचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सशस्त्र आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बुधवारी धुळवडीच्या दिवशी एक मोठा गंभीर गुन्हा टळला.

ठळक मुद्देतीन सशस्त्र आरोपी गजाआड : मोठा गुन्हा टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राने नेलेली मोटरसायकल लवकर परत आणली नाही म्हणून झालेल्या वादानंतर परस्पराचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सशस्त्र आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बुधवारी धुळवडीच्या दिवशी एक मोठा गंभीर गुन्हा टळला.कमल दिलीप दमके (वय २७, रा. बेसा मार्ग, रामटेकेनगर) राज ऊर्फ भल्ला अरविंद गणवीर (वय २८, रा. बेलतरोडी)आणि राजू जीवन रामटेके (वय २८, रा. महाकालीनगर, कालीमाता मंदिरजवळ बेलतरोडी) अशी आरोपींची नावे आहेत.हे तिघेही एकमेकांना ओळखतात. धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास रामटेके त्याची पहिली पत्नी मनीषा हिला भेटायला महाकालीनगरात गेला होता, सोबत त्याचा मित्र अनिल चैरावार होता. तेथे त्यांना आरोपी कमल दमके भेटला. अनिलला तातडीने भाजी घरी घेऊन जायची होती. त्यामुळे त्याने दमके याची मोटरसायकल नेली. बराच वेळ होऊनही अनिल मोटरसायकल घेऊन परत आला नाही. त्यामुळे आरोपी दमकेने रामटेकेसोबत वाद घालून त्याला मारहाण केली. तेवढ्यात त्याचा साथीधार भल्ला गणवीर तेथे आला. दमकेने चिथावणी दिल्याने भल्लाने आपल्या जवळचे घातक शस्त्र बाहेर काढले. ते पाहून रामटेकेने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे बाजूची मंडळी धावत आल्याचे पाहून आरोपी गणवीर आणि दमके तेथून पळून गेले.दरम्यान, अनेकांसमोर मारहाण आणि शिवीगाळ झाल्याने राजू रामटेके अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने चाकू घेऊन गणवीर आणि दमकेचा शोध घेऊ लागला. या भागात गस्तीवर असलेल्या अजनीच्या पोलीस पथकाला तो दिसला. पोलिसांनी रामटेकेला अटक करून त्याच्याकडून चाकू जप्त केला. चौकशीत त्याने गणवीर आणि दमकेला धडा शिकविण्याच्या तयारीने आपण निघालो होतो, अशी माहिती दिली. त्यांच्याकडे घातक शस्त्र असून, ते गेम करण्याच्या तयारीत असल्याचेही पोलिसांना सांगितले.पोलिसांची धावपळपोलिसांनी लगेच शोधाशोध करून आरोपी गणवीर आणि दमकेला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक तलवार जप्त केली. परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे, बेलतरोडीचे ठाणेदार विजय तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप आगरकर, हवालदार अविनाश ठाकरे, नायक रणधीर दीक्षित, संतोश, प्रशांत सोनुलकर, राजेंद्र नागपुरे आणि महिला शिपायी भाग्यश्री यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे तिन्ही आरोपी गजाआड झाले. परिणामी धुळवडीच्या दिवशी एक गंभीर गुन्हा टळला.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा