नागपुरातून चेन्नईकडे थेट उड्डाणाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:13 IST2018-08-02T22:11:24+5:302018-08-02T22:13:50+5:30
नागपुरातून चेन्नईकरिता स्वतंत्र विमानाची मागणी करण्यात येत आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गावर विमानासाठी प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार नागरी उड्ड्यण संचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईन्स आणि गो-एअरला मंजुरी दिली आहे.

नागपुरातून चेन्नईकडे थेट उड्डाणाची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातून चेन्नईकरिता स्वतंत्र विमानाची मागणी करण्यात येत आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गावर विमानासाठी प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार नागरी उड्ड्यण संचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईन्स आणि गो-एअरला मंजुरी दिली आहे.
दक्षिण-पूर्वोत्तर देशांमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय सेवांसाठी चेन्नईला जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय दक्षिण-पूर्वोत्तम देशांमध्ये सिंगापूर, मलेशिया, इंडोनिशिया, थायलँड, लाओस, व्हिएतनाम या देशांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. पर्यटकांसाठी चेन्नई सर्वोत्तम विमानतळ समजले जाते. प्राप्त माहितीनुसार, सध्या चेन्नईकडे जाणाऱ्या रेल्वेत एसी सेकंड क्लास कोचमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या १०० पेक्षा जास्त असते. त्यामुळे थेट चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळत नाही. नागपूर विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले की, या मार्गावर रुची ठेवणाऱ्या विमान कंपन्या या पैलूंवर विश्लेषण आणि प्रवासी संख्येचे आकडे गोळा करीत आहेत. त्यानंतरच विमान कंपन्या नवीन विमानसेवा वा कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. प्रारंभी या मार्गावर एटीआर विमान सुरू करता येऊ शकते. तसेच हैदराबाद मार्गाने विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
नागपूर-चेन्नई विमानासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव
दक्षिण-पूर्वोत्तर देशांमध्ये पर्यटनासाठी पर्यटकांची वाढती रुची आणि अन्य पैलूंवर विचार करून काही विमान कंपन्या चेन्नई मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा विचार करीत आहे. गो-एअर आणि इंडिगो एअरलाईन्सला डीजीसीएकडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय नागपूर-चेन्नई विमानसेवेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेन्नईकरिता थेट विमानसेवा किंवा कनेक्टिव्हिटी देण्याचा विमान कंपन्यांना प्रस्ताव दिला आहे.
आबिद रुही, महाव्यवस्थापक, एमआयएल.