शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

हिवाळी अधिवेशन तयारी; शुक्रवारपासून सचिवालय नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 10:48 AM

येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. कमी दिवस असल्यामुळे सध्या दिवसरात्र काम सुरू आहे. नागभवन व रविभवन येथील मंत्र्यांचे बंगले सज्ज आहेत.

ठळक मुद्देमंत्र्यांचे बंगले सज्ज, प्रतीक्षा खातेवाटपाची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. कमी दिवस असल्यामुळे सध्या दिवसरात्र काम सुरू आहे. नागभवन व रविभवन येथील मंत्र्यांचे बंगले सज्ज आहेत. बंगल्यावर नाव लिहिण्यासाठी पाट्याही तयार आहेत, परंतु या पाट्यांवर नाव कुणाचे लिहावे, असा प्रश्न आहे. त्यामुळे या पाट्यांना खातेवाटपासह, मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. कारण खातेवाटप होताच मंत्र्यांना बंगल्याचे वाटप होणार आहे. दरम्यान, ६ डिसेंबरपासून सचिवालय नागपुरात दाखल होणार असून कामकाजास सुरुवात करणार आहे.मुख्यमंत्र्यांसाठी शासकीय निवासस्थान रामगिरी आहे तर उपमुख्यमंत्री किंवा दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री यांच्यासाठी देवगिरी हा बंगला राखीव असतो. मागच्या भाजप सेनेच्या काळात उपमुख्यमंत्री पद रिकामे होते. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अशीच देवगिरी बंगल्यांची ओळख आहे. आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही सध्या खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे हा बंगला कुणाच्या वाट्याला येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसे देवगिरी आपल्याला मिळावा, यासाठी मंत्र्यांकडून जोर लावला जात असल्याचीही माहिती आहे. ज्येष्ठतेनुसारच देवगिरी बंगल्याचे वाटप केले जाते.नागपूर हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने रंगरंगोटी आणि डागडुजीचे सुरू केलेले काम अंतिम टप्प्यात आहे. रविभवन येथे कॅबिनेट मंत्र्यांचे ३० बंगले आहेत.विधिमंडळातील अधिकारी आज दाखल होणारहिवाळी अधिवेशनासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी हे गुरुवारला दाखल होणार आहेत. कॉम्प्युटर सेटिंग आणि पत्रकारांच्या पासेस बनवण्यासाठी काही कर्मचारी हे बुधवारी नागपुरात दाखल झालेले आहेत. काही अधिकारी उद्या येतील. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.विभागीय आयुक्त घेणार आज आढावानागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार हे उद्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतील. या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन