शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

नागपुरात  एमडीची तस्करी करणारे प्रेमीयुगुल जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:48 AM

गुन्हे शाखेच्या पथकाने एका प्रेमीयुगुलाला एमडी (मेफेड्रॉन) पावडर नामक अमली पदार्थाची तस्करी करताना पकडले.

ठळक मुद्दे३६ ग्राम एमडी जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने एका प्रेमीयुगुलाला एमडी (मेफेड्रॉन) पावडर नामक अमली पदार्थाची तस्करी करताना पकडले. विजय धनराज वंजारी (वय ३२, रा. न्यू कॉलनी, मंगळवारी बाजार) आणि पायल शंकर चरडे (वय २४, रा. कुंभारपुरा बगडगंज), अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३६ ग्राम एमडी जप्त करण्यात आले.पोलिसांच्या माहितीनुसार, पायल मूळची जबलपूरची रहिवासी असून विजय प्रॉपर्टी डीलिंग करायचा. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांना एमडीचे व्यसन लागले. व्यसनपूर्ती तसेच दोघांचा खर्च भागविण्यासाठी विजयने प्रॉपर्टी डीलिंग सोडून एमडीची तस्करी सुरू केली. पायलही त्यात गुंतली. त्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पंटरच्या माध्यमातून या दोघांवर नजर ठेवली. रविवारी हे दोघे एमडीची खेप घेऊन दुचाकीने निघाल्याचे कळताच, त्यांना सेंट्रल एव्हेन्यूवरील आजमशहा चौकात पकडण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे ३६ ग्राम एमडी पावडर, ३०० रुपये आणि मोबाईल मिळाले. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत १ लाख ८ हजार रुपये आहे.गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात एनडीपीएसचे पोलीस निरीक्षक राजू बहादुरे, सहायक निरीक्षक शशिकांत पाटील, एएसआय अविनाश तायडे, हवालदार संतोष ठाकूर, विनोद मेश्राम, अजय ठाकूर, नितीन रांगणे, राहुल गुमगावकर, सचिन सेलोकर, अमोल पडधान आणि कुंदा जांभूळकर यांनी ही कामगिरी बजावलीदोन दिवसात तीन कारवायागुन्हे शाखेची दोन दिवसातील तिसरी कारवाई होय. शनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अनमोल सिद्धार्थ खोब्रागडे (वय ३२) याला जेरबंद केले. त्याच्याकडून ८१ हजार रुपये किमतीचे २७ ग्राम मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आले. तर मृणाल गजभिये नामक आरोपीला अटक करून त्याच्याकडून सीताबर्डी पोलिसांनी रविवारी एमडी पावडर जप्त केले होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटक