अनिल देशमुखांचे 'ते' भाकित खरे ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 14:08 IST2019-11-28T13:45:58+5:302019-11-28T14:08:30+5:30
निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येतील, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक प्रचार सभेत जाहीरपणे केले होते.

अनिल देशमुखांचे 'ते' भाकित खरे ठरले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येतील, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक प्रचार सभेत जाहीरपणे केले होते. अखेर ते भाकित खरे ठरले. या संबंधीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. यामुळे देशमुख यांना या पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडीची माहिती होती का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
अनिल देशमुख हे १९९५ ते २०१४ या काळात देशमुख मंत्री होते. गेल्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी अन्न व औषधी प्रशासन मंत्रीपद भूषविले होते. युतीच्या काळातही त्यांनी मंत्रीपद भुषविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेतही त्यांचे चांगले संबंध आहे. यामुळेच त्यांना भविष्यातील घडामोडीची माहिती आधीच मिळाली असावी व त्यामुळेच त्यांनी निवडणुकीपूर्वीच जाहीरपणे तिन्ही पक्ष एकत्र येतील, असे वक्तव्य केले असावे, असे अंदाज बांधले जात आहे. काहिही असले तरी देशमुखांनी केलेले भाकित आता खरे ठरले असल्यामुळे देशमुख यांना अंतर्गत गोटातील माहिती असते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचा तत्कालिन व्हिडिओ व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.