शासकीय कार्यालयातील महिलांची आजपासून कर्करोगपूर्व तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:06+5:302021-02-06T04:11:06+5:30

दर शुक्रवार व शनिवारी होणार पूर्व तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षातर्फे राज्य शासनाच्या ...

Pre-cancer screening of women in government offices from today | शासकीय कार्यालयातील महिलांची आजपासून कर्करोगपूर्व तपासणी

शासकीय कार्यालयातील महिलांची आजपासून कर्करोगपूर्व तपासणी

दर शुक्रवार व शनिवारी होणार पूर्व तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षातर्फे राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची कर्करोगपूर्व तपासणी करण्यात येणार आहे. या विशेष शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते उद्या ५ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

पहिल्या टप्प्यात पोलीस विभागातील कार्यरत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर इतर विभागातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येईल. या शिबिरात विविध वैद्यकीय चाचण्यांची तपासणी करण्यात येईल. शासकीय विभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. के. आर. सोनपुरे यांनी केले आहे.

या विशेष शिबिरात स्त्रीरोग व प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. अनु भुते तपासणी करणार आहेत. या शिबिरामध्ये अभियान संचालक, नॅशनल हेल्थ मिशन, नागपूर येथील समन्वयक श्रीमती गीतांजली बुटी, श्रद्धानंद अनाथालयाच्या सचिव डॉ. कुंतल सोनपुरे, आरुण्या फाऊंडेशन, नागपूर, आकार स्कूल ऑफ नर्सिंग, हिंगणा, श्री गोविंदा मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सोसायटी यांचे सहकार्य लाभणार असल्याचे डॉ. सोनपुरे यांनी सांगितले आहे.

Web Title: Pre-cancer screening of women in government offices from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.