शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नागपूर शहरात रविवारी प्रभू श्रीरामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:23 IST

गुढीपाडव्यापासूनच शहरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. शहरातील ४० हून अधिक संस्था शहरात निघणाऱ्या शोभायात्रेच्या कामात व्यस्त आहे. श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या  शोभायात्रेचे हे ५२ वे वर्ष आहे.

ठळक मुद्देश्रीराम जन्मोत्सव: श्री पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेचे ५२ वे वर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुढीपाडव्यापासूनच शहरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. शहरातील ४० हून अधिक संस्था शहरात निघणाऱ्या शोभायात्रेच्या कामात व्यस्त आहे. श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या  शोभायात्रेचे हे ५२ वे वर्ष आहे.श्रीराम जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रामसेवकांना त्यांच्या जबाबदाऱ्या  सोपविण्यात आल्या आहे. सोबतच निघणारे चित्ररथही तयार झाले आहे. यासंदर्भात गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीने पत्रपरिषद घेतली. यात समितीचे वरिष्ठ सदस्य पुनित पोद्दार म्हणाले की, ५० हून अधिक चित्ररथ, ११ नृत्य पथक, १०८ मंगल कलशधारी महिला यात सहभागी होतील. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही शंखनादाची परंपरा सुद्धा कायम आहे. ४०० युवक आत्माराम धुमारे यांच्या नेतृत्वात श्रीरामाच्या रथापुढे शंखनाद करणार आहे. पत्रपरिषदेला मंदिराचे ट्रस्टी रामकृष्ण पोद्दार, पं. उमेश शर्मा, सुरेश अग्रवाल, शांतिकुमार शर्मा, संतोष काबरा, भूषण गुप्ता, जयंत हरकरे आदी उपस्थित होते. २५ मार्च रोजी पहाटे ४ वाजता उत्थापन होईल. मंगल आरती, अभिषेक व अभ्यंगस्नान होईल. शहनाई वादनानंतर श्रीरामकृष्ण मठ कीर्तन मंडळ कीर्तनाचे सादरीकरण क रेल. दुपारी १२ वाजता रामजन्माचा सोहळा होईल.शोभायात्रेचा मार्ग बदलणार नाहीशोभायात्रा सायंकाळी ५ वाजता मंदिरातून निघेल. अतिथींच्याहस्ते श्रीरामाचे पूजन झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात होईल. शहरात सिमेंट रस्ते व मेट्रोचे निर्माण कार्य सुरू असल्यामुळे मार्ग बदलविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु मार्गात कुठेही बदल करण्यात आलेले नाही. रस्त्यावरील बॅरीकेट काढून रस्त्याचे समतलीकरण करण्यात आले आहे. मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाल्यानंतर शोभायात्रा काकडे चौक होत हंसापुरी, नालसाहब चौक, गांजाखेत, भंडारा रोड, शहीद चौक, चितार ओळ, पं. बच्छराज व्यास चौक, केळीबाग रोड, महाल, गांधीगेट, टिळक पुतळा, सुभाष मार्ग, आग्याराम देवी चौक, श्री गीता मंदिर, कॉटन मार्केट, डॉ. मुंजे चौक, सीताबर्डी मेन रोड, झाशी राणी चौक, मानस चौक, स्टेशन रोड होत संत्रा मार्केट येथे पोहचेल. शोभायात्रेची व्यवस्था ३०० संस्थेचे १८००० स्वयंसेवक सांभाळतील.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरnagpurनागपूर