शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

पोक्सोत आरोपीला दहा वर्षे कारावास

By admin | Updated: January 6, 2017 02:16 IST

खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध होऊन लैंगिक अपराधापासून

विशेष न्यायालय : शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरण नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध होऊन लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्याचे (पोक्सो) विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राहुल रामू जनबंधू (२२), असे आरोपीचे नाव असून तो पिपळा डाक बंगला येथील रहिवासी आहे. अत्याचाराची ही दुर्दैवी घटना ६ मे २०१५ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली होती. घटनेच्या दिवशी रविवार असल्याने शाळेला सुटी होती. त्यामुळे पीडित मुलगी ही घरच्या बकऱ्या घेऊन जंगलात चारण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिला जंगलात एकटी पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला होता.घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास त्याने जीवे मारण्याची धमकीही पीडित मुलीला दिली होती. ती घरी परतताच तिने घडलेली घटना आपल्या वडिलांना सांगितली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून दुसऱ्या दिवशी ७ मे २०१५ रोजी सकाळी ५.४० वाजता भादंविच्या ३७६ (१)(२) आणि लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरोपी राहुल जनबंधू याला पोलिसांनी अटक केली होती. महिला पोलीस उपनिरीक्षक भारती कोठे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने सहा आणि बचाव पक्षाच्या वतीने एक साक्षीदार तपासण्यात आला. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ३७६ (२)(१) कलमांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड, लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्याच्या कलम ६ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील आसावरी पळसोदकर यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. म्हात्रे, सहायक फौजदार अरुण भुरे, सलीम शेख, दिलीप कडू आणि हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)