उमरेड शहरात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST2021-05-10T04:09:26+5:302021-05-10T04:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले ...

उमरेड शहरात विजेचा लपंडाव
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून, सोशल मीडियावरसुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
परिसरात दोन दिवसांपासून जोराचा वारा, विजांचा कडकडाट यांसह अधेमध्ये पाऊसधारा बरसल्या. या संपूर्ण नैसर्गिक कारणांमुळे काही ठिकाणच्या विद्युततारा तुटल्या; तर काही ठिकाणी ब्रेकडाऊनची परिस्थिती उद्भवली. वारंवार विद्युत उघडझाप तसेच तासन्तास वीज गायब झाल्यामुळे अनेकांना त्रास सोसावा लागला. दुसरीकडे, विद्युत अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे चमू दुरुस्तीसाठी धावपळ करीत होते.
....
रुग्णांची गैरसाेय
विजेच्या लपंडावामुळे कोविड सेंटरमधील तसेच होम क्वॉरंटाईन असलेल्या असंख्य रुग्णांची चांगलीच गैरसोय झाली. तातडीने दुरुस्ती करण्याची आणि नियोजन आखण्याची मागणी नागरिकांनी केली. अखेरीस दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान वीज सुरू झाली.