शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुन्हा वीज संकटाची परिस्थिती; ३ वीज केंद्र संवेदनशील स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 08:00 IST

Nagpur News औष्णिक वीज केंद्रात कोळसा तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल-मे मध्ये लोडशेडिंग करावे लागले. राज्यात सध्या तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोळसा आयातीनंतर ही पुरेसा साठा नाही

कमल शर्मा

नागपूर : औष्णिक वीज केंद्रात कोळसा तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल-मे मध्ये लोडशेडिंग करावे लागले. राज्यात सध्या तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मान्सून सक्रिय झाला असून औष्णिक वीज केंद्रामध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सात पैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे. अशा परिस्थितीत मान्सूननंतर विजेची मागणी वाढली तर ती पूर्ण करणे कठीण जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यात अनेक कोळसा खाणींमध्ये पाणी जमा होते. कोळशाची वाहतूकही कठीण होऊन जाते. त्यामुळे वीज केंद्रामध्ये पावसाळा लागण्यापूर्वीच कोळशाचा जास्तीत जास्त साठा वाढवणे आवश्यक असते. पावसाळा संपल्यावर विजेची मागणी अचानक वाढते, त्यानुसार विजेचे उत्पादन करण्यासाठी हा साठा उपयोगी पडतो. साधारणपणे महाजेनको मान्सूनपूर्वी किमान १५ दिवस व त्यापेक्षा अधिकचा साठा तयार करीत असतो. यावर्षी पहिल्या सहा वर्षात कोळशाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. लोडशेडिंग सुद्धा झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंडोनेशिया येथून २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात केला जात आहे. परंतु यानंतरही वीज केंद्रांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. कोराडी (६६० मेगावॉट) वीज केंद्रात ३.५७ दिवस, भुसावळ ५.११ दिवस व परळी येथे ६.२० दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. वीज केंद्रात ७ दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर त्याला संवेदनशील मानले जाते. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारसमोर वीज संकटाचे आव्हान उभे ठाकले आहे.

महाजेनकोला परिस्थिती आटोक्यात आणण्याचा विश्वास

यासंदर्भात महाजेनकोचे अधिकारी उघडपणे काही बोलायला तयार नाही. परंतु नाव न छापण्याच्या अटीवर मात्र कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याची बाब मान्य करीत आहे. यासोबत आयात होणाऱ्या कोळशाच्या भरवशावर ही परिस्थिती आटोक्यात आणू असा विश्वासही अधिकाऱ्यांना आहे.

टॅग्स :electricityवीज