नागपुरातील ‘माफसू’ कुलगुरूपदाच्या मुलाखती ‘पोस्टपोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:33 IST2017-12-08T00:32:32+5:302017-12-08T00:33:48+5:30

‘माफसू’च्या (महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) कुलगुरूपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

'Postpone' interviews of 'MAFSU' Vice Chancellor in Nagpur | नागपुरातील ‘माफसू’ कुलगुरूपदाच्या मुलाखती ‘पोस्टपोन’

नागपुरातील ‘माफसू’ कुलगुरूपदाच्या मुलाखती ‘पोस्टपोन’

ठळक मुद्देदोन उमेदवारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह म्हणून ?

आॅनलाईन लोकमत
नागपूर : ‘माफसू’च्या (महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) कुलगुरूपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखांची घोषणादेखील झालेली नाही. या मुलाखती ‘पोस्टपोन’ का झाल्या, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मुलाखती आता २४ डिसेंबर रोजी घेण्यात येऊ शकतात. पात्र १५ उमेदवारांना मुंबईत मुलाखतींसाठी बोलविण्यात आले होते. यातील पाच जणांची अंतिम मुलाखतीसाठी निवड होणार होती. मात्र मुलाखतीच्या दोन दिवसअगोदरच सर्वांना ‘ई-मेल’च्या माध्यमातून मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दोन उमेदवारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार निवड समितीतील सदस्य भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहामात्रा यांच्या नातेवाईकाचे निधन झाले. त्यामुळे मुलाखती समोर ढकलण्यात आल्या.

Web Title: 'Postpone' interviews of 'MAFSU' Vice Chancellor in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.