शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नागपूर शहराचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 19:45 IST

नागपूर शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे.

ठळक मुद्देनीरीच्या संशोधकांचा अहवालधुलीकण, एसओटू, एनओटू, कार्बन निम्म्याने घटले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारी नियंत्रित करण्यासाठी लागलेल्या टाळेबंदीमुळे एकिकडे जनजीवन ठप्प पडले आहे पण दुसरीकडे याच टाळेबंदीमुळे प्रदूषण मात्र अनेक वर्षांच्या निचांकीवर आले आहे. कोट्यवधी खर्च करून जे शक्य झाले नसते ते टाळेबंदीने शक्य झाले. शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या वैज्ञानिकांनी लॉकडाउनपूर्वी आणि नंतर घेतलेल्या हवेतील नमुन्यांच्या अभ्यासातून प्रदूषणामध्ये झालेला हा बदल स्पष्ट होत असल्याचे सांगितले. सीएसआयआर-नीरीच्या वायु प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रमुख आणि मुख्य वैज्ञानिक डॉ. के.व्ही. जॉर्ज यांच्या मार्गदर्शनात नीरीचे प्रमुख संशोधक डॉ. नीलकमल यांच्या चमूने हा अभ्यास केला. या अभ्यासात लॉकडाउनपूर्वी सामान्य जनजीवन असताना २० फेब्रुवारी ते २० मार्च या काळातील व लॉकडाउननंतर २१ मार्च ते १७ एप्रिलपर्यंतचे हवेचे नमुने तपासण्यात आले. नागपूर शहरात सामान्य जनजीवन असताना सर्वाधिक प्रदूषण हे धुलीकणांचे असते. ते सरासरी ६० ते ७० मायक्रोग्रॅम/मीटर क्यूब पासून १२०म्युग्रॅ/मी. क्यूबची धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचला आहे. मात्र लॉकडाउनमुळे ही पातळी ४० ते ४७ म्युग्रॅ/मी.क्यूब पर्यंत खाली आली आहे. पीएम-१० ६० ते ७० युनिटवरून ४७ वर आले आहे तर पीएम-२.५ चा स्तर २३ युनिटपर्यंत खाली आला आहे.दुसरीकडे रस्त्यावर वाहनसंख्या कमालीची घटल्याने एनओटूचे प्रमाणही घटले आहे. एनओटू ४८ म्यूग्रॅ/मी.क्यूबवरून २५ म्यूग्रॅ/मी.क्यूब पर्यंत खाली घसरला आहे. परिसरात उर्जा प्रकल्पामुळेही शहरातील प्रदूषणात कायम वाढ आलेली आहे. दरम्यान फेब्रुवारी ते एप्रिलच्या काळात हवेचा प्रवाह जमिनीपासून २४० मीटरवरून उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पश्चिमच्या दिशेने असल्याने नागपूर शहर एसओटूच्या प्रदूषणापासूनही मुक्त राहिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एसओटूचे प्रमाण ९ म्यूग्रॅ/मी.क्यूबवरून २ म्यूग्रॅ/मी.क्यूवर घसरले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान सायंकाळच्या वेळी तापमान कमी होत असल्याने प्रदूषणाच्या वर जाण्याची प्रक्रिया खंडित होत असल्याने पीएम-२.५ मध्ये थोडी वाढ होत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :pollutionप्रदूषणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस