शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वेमुलाच्या आत्महत्येवरून होणारे राजकारण दुर्दैवी

By admin | Updated: January 23, 2016 03:04 IST

हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना अतिशय दु:खद आहे.

‘अभाविप’ने केली डाव्या पक्षांची निंदा : घातपाताची शंकानागपूर : हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना अतिशय दु:खद आहे. परंतु या माध्यमातून होणारे राजकारण आणखी दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन ‘अभाविप’ पदाधिकाऱ्यांनी केले आहे. रोहितची आत्महत्या हा घातपाताचा प्रकार तर नव्हे, अशी शंका ‘अभाविप’चे राष्ट्रीय महामंत्री श्रीहरी बोरीकर यांनी उपस्थित केली.‘अभाविप’तर्फे या मुद्यावर शुक्रवारी सकाळी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरून देशात राजकारण पेटले असून सामाजिक दरी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डावे पक्ष वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत. विद्यापीठातील देशद्रोही कारवायांबद्दल बंडारू दत्तात्रेय यांच्यासोबतच काँग्रेस खासदार हनुमंत राव यांनीदेखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र पाठवले होते. परंतु, त्याचा उल्लेख टाळला जात आहे हे आश्चर्यजनक आहे. रोहितने आत्महत्या केली की, त्याच्यापुढे तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली याचा शोध घेणे आवश्यक आहे. यामागे घातपातदेखील असू शकतो, अशी शक्यता बोरीकर यांनी बोलून दाखविली.(प्रतिनिधी)न्यायालयीन चौकशीची केली मागणीरोहितच्या आत्महत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ‘अभाविप’तर्फे करण्यात आली. विशेष म्हणजे त्यानंतर काही वेळातच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली. न्यायालयीन चौकशीतून आत्महत्येसंदर्भातील विविध पैलू तसेच ‘आंंबेडकर स्टुडंट असोसिएशन’ची भूमिका याबाबतीत अनेक बाबी उलगडतील, असे बोरीकर म्हणाले.देशद्रोह्यांचे समर्थन का?‘आंबेडकर स्टुडंट असोसिएशन’च्या माध्यमातून हैदराबाद विद्यापीठात सक्रिय असलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि विद्यापीठात ‘बीफ फेस्टिव्हल’ आणि ‘महिषासूर-डे’ असे कार्यक्रम सुरू केले होते. त्यानंतर दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीला त्यांनी विरोध सुरू केला. या संघटना ‘आंबेडकर स्टुडंट असोसिएशन’ देशद्रोह्यांचे समर्थन करीत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली डावे आणि संबंधित संघटना देशद्रोह्यांचे समर्थन करीत असेल तर ‘अभाविप’ला त्यावर भाष्य करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का, असा प्रश्नदेखील बोरीकर यांनी उपस्थित केला.