शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अनिल देशमुखांवरील हल्ल्याचे राजकीय पडसाद

By जितेंद्र ढवळे | Updated: November 19, 2024 11:45 IST

या घटनेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री काटोलजवळ झालेल्या हल्ल्याचे राजकीय पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. या घटनेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. तर भाजपकडून हा हल्ला स्टंटबाजी असल्याचा आरोप होत आहे.

लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेतअनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषत: विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणे किंवा हल्ला करणे, असा प्रकार होईल, अशी चर्चा आम्ही यापूर्वी तिथे ऐकली होती. आम्ही या घटनेचा निषेध करतो. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले.- खा. शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हमाजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर ताबडतोब अशा प्रकारची घटना घडणे हे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. राज्यात आचारसंहिता लागू असताना ज्येष्ठ नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाला झटकता येणार नाही. निवडणूक आयोगाने राज्यात आचारसंहितेचे उल्लंघन आणि कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी हल्लेखोर आणि यामागे अदृश्य हात असलेल्यांचा छडा लावून ताबडतोब कडक कारवाई करावी.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

हा राजकीय हल्ला आहेनागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला. हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो, हे निंदनीय आहे.- खा. संजय राऊत, नेते, उद्धवसेना

विरोधकांना सुरक्षा पुरविली जात आहेअनिल देशमुख यांच्यावरील हल्ला निंदनीय आहे. माजी गृहमंत्र्यांवर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची काटोलमध्ये ताकद वाढली आहे. विरोधकांना पराभव दिसत असल्याने असा भ्याड हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची सखोल चौैकशी करावी. माजी गृहमंत्र्यांवर हल्ला झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये वा आमच्या घरासमोर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. उलट विरोधकांना सुरक्षा पुरविली जात आहे. याला काय म्हणावे?- सलील देशमुख, उमेदवार, महाविकास आघाडी, काटोल सर्व बाबी संशयास्पद आहेतहा हल्लाच बनावट आहे. अनिल देशमुखांकडून असा प्रकार होऊ शकतो, असे भाकीत मी अगोदरच प्रचार सभांमध्ये वर्तविले होते. लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी हा ड्रामा करण्यात आला आहे. काटोलमधील जनतेला मी याबाबत अगोदरच सतर्क केले होते. या घटनेचे विविध फोटो पाहिले की यातील फोलपणा लक्षात येत आहे. या सर्व बाबी संशयास्पद आहेत.- आ. परिणय फुके, भाजप नेते लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट नकोकाटोलजवळ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, त्यात ते जखमी झाल्याची घटना धक्कादायक आहे. निवडणुकीच्या रूपात लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना राज्यातील ज्येष्ठ नेत्यावर गुदरलेला हा प्रसंग किंवा जळगावात एका उमेदवाराच्या घरावर गोळीबार, धामणगाव रेल्वे येथे आ. प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूहल्ला, राज्यात काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लावणाऱ्या इतर काही घटना चिंताजनक आहेत. शाहू-फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा, सुसंस्कृत राजकारणाची परंपरा, शत्रूलाही सन्मानाची वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आदर्श जपण्याची, तो पुढच्या पिढ्यांच्या हाती सोपविण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. हिंसेच्या अशा घटना आपल्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत. या घटनांचा मी निषेध करतो आणि लोकशाहीचा उत्सव शांततेत, प्रेमाने साजरा करण्याचे आवाहन मतदारराजाला करतो.- डाॅ. विजय दर्डा,चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड तथा माजी राज्यसभा सदस्य

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Anil Deshmukhअनिल देशमुख