शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांना नगरपंचायत निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST

शरद मिरे भिवापूर : भिवापूर नगरपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झाला असून पदारूढ नगरसेवक पदमुक्त झाले आहे. मार्च महिन्यात नगरपंचायतीची ...

शरद मिरे

भिवापूर : भिवापूर नगरपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झाला असून पदारूढ नगरसेवक पदमुक्त झाले आहे. मार्च महिन्यात नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, राजकीय पक्षांनी मेळावा आणि आढावा सभेच्या आयोजनाला विशेष महत्त्व दिले आहे. त्यात भाजप व काँग्रेस प्रथम स्थानी आहे तर शहरात तरुण कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी मजबूत असलेली शिवसेना त्यात काहीशी मागे पडल्याची दिसते. राष्ट्रवादी व बसपानेसुद्धा चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागल्याचे दिसते.

राज्यात नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तीन नगरपरिषदा व ६५ नगरपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संभाव्य निवडणूक क्षेत्रात संपन्न झाला आहे. भिवापूर नगरपंचायतीत १७ प्रभागांची आरक्षण सोडत महिनाभरापूर्वी निघाली. त्यानुसार इच्छुकांनी जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता, राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन व केलेल्या विकासकामांचे मार्केटिंग करणे सुरू केले आहे. गत चार दिवसांपूर्वी माजी आ. सुधीर पारवे यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शहरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्याच दिवशी आ. राजू पारवे यांनी नगरपंचायतीच्यावतीने आयोजित ‘कोरोना योद्धा’ कार्यक्रमात शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. मात्र, या राजकीय चढाओढीत शिवसेना काहीशी मागे पडल्याचे दिसते. कधी नव्हे त्या राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा प्रथमच शहरात कार्यालयाची दारे कार्यकर्त्यांसाठी उघडी केली आहे. त्यामुळे सध्या स्थितीत शहरात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

विकास कुणी केला?

भिवापूर शहर हे आजी व माजी आमदारांचे गृहशहर आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत पारवे बंधूंची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शहरात विकासकामांना गती मिळाल्याचे काँग्रेसकडून सांगितल्या जात आहे तर ही सर्व कामे भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाल्याचे भाजप कार्यकर्ते ठासून सांगत आहे. त्याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे.