शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

राजकीय ‘नेता’जी

By admin | Updated: July 19, 2014 02:28 IST

विद्यार्थी जीवनापासून सातत्याने विविध सामाजिक

एका शब्दावर कार्यकर्त्यांची फळी कामाला लागायचीनागपूर : विद्यार्थी जीवनापासून सातत्याने विविध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असणाऱ्या नेताजींचा लोकसंग्रह विलक्षण होता. त्यांच्या एका शब्दावर कार्यकर्त्यांची फळी कामाला लागत होती. त्यामुळे सामाजिक चळवळीत त्यांचे वजन वाढले. स्वाभाविकपणे राजकीय पक्षांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण होतेच. यातूनच नेताजी सीपीआय पक्षात दाखल झाले. जवळपास १५ वर्षे पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी आणि दलित चळवळीला पाठबळ दिले. याशिवाय प्रत्येक डाव्या, पुरोगामी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध राहिला. त्यानंतर १९९० साली जनता दलाचे आमदार म्हणून ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून निवडून आले. आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द वादळी राहिली. हा माणूस नेता असला तरी सामान्य माणसाशी कायम जुळून राहिला. त्यामुळेच नेताजींबद्दल आपला माणूस असल्याची भावना लोकांमध्ये सातत्याने राहिली. आमदार असतानाच ते अनुसूचित जमाती कल्याण मंडळाचे अध्यक्ष राहिले. सांस्कृतिक क्षेत्रातील काम नेताजींना नाट्यविषयक आवड होती. सामाजिक काम उभारताना लोकांना एखादा विषय समजावून सांगण्यासाठी पथनाट्यांचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळे कला क्षेत्राशी ते जुळले होते. अनेकांनी त्यांना नाटक लिहिण्याची विनंती केली होती पण ते या प्रकाराकडे वळले नाहीत. त्यांनी विपुल लेखन केले आहे. विविध विषयावरचे त्यांचे वृतपत्रीय लेखन गाजले. हे लेखन पुस्तकरूपाने यावे, म्हणून अनेकांनी त्यांना गळ घातली पण नेताजी सातत्याने सामाजिक चळवळीतच गुंतून राहिले. त्यामुळे त्यांचे पुस्तक आले नाही. नागपुरात नुकतेच अण्णाभाऊ साठे राज्यस्तरिय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. हे संमेलन आयोजित करण्यात नेताजी राजगडकर यांचा पुढाकार सर्वविदित आहे. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर आकाशवाणीतही त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून काम केले. या दरम्यान विविध वृत्तपत्रात सामाजिक प्रबोधन करणारे त्यांचे स्तंभलेखन चांगलेच गाजले. आदिवासी, दलित आणि डाव्या, पुरोगामी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या निधनाने अनेक संस्थांचा मार्गदर्शक दीपस्तंभ कोसळला आहे. (प्रतिनिधी)