१.९२ लाख बालकांना दिला पोलिओ डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:34+5:302021-02-05T04:53:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पल्स पोलिओ निर्मूलन अभियानांतर्गत रविवारी नागपूर शहरातील १ लाख ९२ हजार ३८७ बालकांना ...

Polio dose given to 1.92 lakh children | १.९२ लाख बालकांना दिला पोलिओ डोज

१.९२ लाख बालकांना दिला पोलिओ डोज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पल्स पोलिओ निर्मूलन अभियानांतर्गत रविवारी नागपूर शहरातील १ लाख ९२ हजार ३८७ बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला. ही टक्केवारी ६९.५९ इतकी असून शहरातील एकूण २ लाख ७६ हजार ४७३ बालकांना डोज पाजण्याचे उद्दिष्ट आहे. २ फेब्रुवारीपासून आरोग्य विभागातर्फे घरभेटीतून रविवारी डोज न घेतलेल्या बालकांना पोलिओ डोज देण्यात येईल.

शहरात पोलिओ मोहिमेचा शुभारंभ महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्रात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला.

मनपाअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमध्ये एकूण १५२९ बूथ लावण्यात आले होते. शहरातील मनपाचे सर्व दवाखाने, स्वयंसेवी संस्थांचे दवाखाने, शासकीय दवाखाने, रेल्वे दवाखाने आदी ठिकाणी बूथ होते. रेल्वे स्टेशन, गणेश मंदिर, स्वामीनारायण मंदिर, बसस्थानके, विटभट्ट्या, चुंगी नाके येथे ट्रान्झिट टीमच्या माध्यमातमून पोलिओ डोज पाजण्यात आला. विमानतळ, बांधकामे, रस्त्यावरील बालकांना मोबाईल टीमच्या माध्यमातून पोलिओ डोज देण्यात आला. शहरातील बालरोग तज्ज्ञांकडेही पोलिओ लस देण्याची सोय करण्यात आली होती. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या नेतृत्वात नोडल अधिकारी डॉ. वैशाली मोहकर आणि अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्या देखरेखीत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

....

२ ते ६ फेब्रुवारीदरम्यान घरभेटी

रविवारी जे बालक पोलिओ डोज घेण्यापासून वंचित राहिले असतील अशा बालकांचा शोध आरोग्य विभागाची चमू घरभेटीच्या माध्यमातून घेणार आहेत. २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान शहरातील सर्व घरांना भेट देऊन पोलिओ डोजपासून वंचित राहिलेल्या बालकांना डोज पाजण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोज देण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Polio dose given to 1.92 lakh children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.