प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:41 AM2019-01-28T10:41:56+5:302019-01-28T10:45:20+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करीत कार्यक्रमात गोंधळ घातला.

Policeman misbehaved with girls' on Republic Day program | प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा

Next
ठळक मुद्देदारू पिऊन धिंगाणानांद येथील जि.प.शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करीत कार्यक्रमात गोंधळ घातला. वाळके पोलीस असल्याने गावकऱ्यांनी हे सहन करून घेतले. मात्र खाकीचा धाक दाखवीत गोंधळ घालणाऱ्या वाळकेंवर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

असा आहे घटनाक्रम
नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. या चौकीत चार पोलीस कर्मचाऱ्यांची तैनात आहेत. त्यापैकी दोन बंदोबस्तासाठी मौदा येथे गेले होते तर दोन हजर होते. ध्वजारोहणानंतर नांद पोलीस चौकीत गावकऱ्यांसाठी अल्पोपहाराचा कार्यक्र म आयोजित केला होता. कार्यक्र म आटोपल्यावर ९.३० वाजता उमरेड पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी मारुती आल्टोने या चौकीत आले.
त्यादरम्यान या चौकीत कार्यरत असलेले बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी या उमरेड मित्र पोलिसासोबत दारू ढोसली. यानंतर हे दोघेही पोलीस उमरेडला निघून गेले. त्यानंतर प्रमोद वाळके यावरच थांबले नाही तर नांद येथील एका दारू विक्रेत्यासोबत अजूनही दारू प्यायले.
त्यानंतर ते नांदच्या शाळेत सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पोहचले. कार्यक्रमादरम्यान सहाव्या वर्गातील मुलींचे नृत्याचे सादरीकरण सूरू होते. ते मंचासमोर थोडा वेळ उभे राहिले. यानंतर लगेच मंचावर चढले व खिशात हात टाकून पैशाचे बंडल काढले व नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींच्या मधोमध जाऊन मुलींवर दोनदा पैशाची उधळण केली. यावर उपस्थित नागरिकांनी आक्षेप घेतला व त्यांना मंचावरून उतरविले. वाळके यांच्या या कृत्याचा सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नांद पोलीस चौकीतील बीट अंमलदाराला या ठिकाणावरून कुठेही तात्काळ हलवा. शाळकरी मुलीवर पैशाची उधळण करण्याचे अशोभनीय कृत्य वाळके याने केले. मी स्वत: या पोलीस हवालदाराला स्टेजवरून उतरविले नसते तर अजून कोणता प्रकार केला असता ते सांगता येत नाही. यामुळे वाळके याची नांद येथून तत्काळ हकालपट्टी करावी.
- तुळशीदास चुटे, सरपंच ग्रामपंचायत नांद

 

Web Title: Policeman misbehaved with girls' on Republic Day program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.