शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नागपुरातील  कुख्यात आंबेकरच्या मालमत्तेकडे पोलीस नजर वळविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:47 IST

बाल्या गावंडे हत्याकांडातील फरार आरोपी आणि शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अटक करण्यासंबंधी त्याच्या मालमत्तेकडे पोलीस नजर वळविणार आहेत. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीची मालमत्ता संलग्न केल्यास तो पोलिसांपुढे शरणागती पत्करतो, हे ध्यानात घेत पोलीस त्यासंबंधाने पाऊल उचलणार आहेत.

ठळक मुद्देलाखोंची मालमत्ता संलग्न करण्याचा पोलिसांचा विचारकुख्यात आंबेकर वर्षभरापासून फरार : पोलीस व्यूहरचना बदलविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाल्या गावंडे हत्याकांडातील फरार आरोपी आणि शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अटक करण्यासंबंधी त्याच्या मालमत्तेकडे पोलीस नजर वळविणार आहेत. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीची मालमत्ता संलग्न केल्यास तो पोलिसांपुढे शरणागती पत्करतो, हे ध्यानात घेत पोलीस त्यासंबंधाने पाऊल उचलणार आहेत.बाल्या गावंडेची आपल्या हस्तकांमार्फत हत्या करून घेतल्याचा संतोष आंबेकरवर आरोप आहे. पोलिसांनी त्याला त्या गुन्ह्यात आरोपी करताच तो नागपुरातून फरार झाला. त्याला वर्षभरापासून पोलीस शोधत आहेत. दरम्यान, बाल्या गावंडे हत्याकांडाची न्यायालयात सुनावणी झाली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कोर्टातून मुक्तता झाली. मात्र, संतोष आंबेकर पोलिसांच्या हाती लागला नाही. यासंबंधाने सोमवारी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित झाला असता, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी त्यावर उत्तर दिले. फरार आरोपीची मालमत्ता संलग्न करून त्याला घेरण्याच्या प्रचलित पद्धतीचा संतोष आंबेकरवरही वापर केला जाणार आहे.सुजल वासनिक सापडेनाकामठीतून अपहरण करण्यात आलेल्या सुजल वासनिकचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले नाही, यासंबंधाने प्रश्न उपस्थित झाला असता शोध सुरू आहे, असे उत्तर उपायुक्त कदम यांनी दिले. सुजलचे अपहरण होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. असेच चार दिवसांपूर्वी एका पोलीस पुत्राचे अपहरण झाले. तो परत आल्याची माहिती उपायुक्त कदम यांनी दिली. त्यासंबंधाने विस्तृत माहिती घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक त्या मुलाच्या घरी गेल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर