शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतूकदाराकडून ४५ हजारांची लाच घेताना पाेलीस उपनिरीक्षक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2022 10:38 IST

७५ हजारांची डिमांड, तडजाेडीअंती ४५ हजार रुपये स्वीकारले

नागपूर : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रेतीची वाहतूक करण्यासाठी प्रति ट्रक १५ हजार रुपयांप्रमाणे पाच ट्रकसाठी ७५ हजार रुपयांची मागणी करीत तडजाेडीनंतर ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्यातील पाेलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. १) रात्री ९ वाजताच्या सुमारास बेला परिसरात करण्यात आली.

दिलीप पुंडलिक सपाटे (वय ५७, फ्रेंड्स काॅलनी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखाेर पाेलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारकर्ता बिलालनगर (ता. मंगरूळपीर, जिल्हा वाशिम) येथील असून, त्यांचे काही ट्रक बेला परिसरातून रेतीची वाहतूक करतात. ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दिलीप सपाटे याने त्यांना प्रति ट्रक १५ हजार रुपयांप्रमाणे ७५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नाेंदविली व दिलीप सपाटे याला ४५ हजार रुपये देण्याचे कबूल केले.

ठरल्याप्रमाणे त्यांनी दिलीप सपाटेला गुरुवारी रात्री ४५ हजार रुपये दिले आणि परिसरात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. गुन्हा दाखल हाेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. ही कारवाई एसीबीचे पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पाेलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक योगिता चाफले, पोलीस निरीक्षक आशिष चौधरी व वर्षा मते, सुरेंद्र सिरसाट, अनिल बहिरे, अस्मिता मल्लेलवार, अमोल मेंघरे, हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग